धवनचे वनडेत ५००० रन पूर्ण, ब्रायन लाराची केली बरोबरी

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनचा नवा रेकॉर्ड

Updated: Jan 23, 2019, 12:12 PM IST
धवनचे वनडेत ५००० रन पूर्ण, ब्रायन लाराची केली बरोबरी title=
नेपियर : न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या वनडे सीरीजच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनने आपले 5000 रन पूर्ण केले आहेत. धवनने माजी कर्णधार सौरव गांगुलीला याबाबतीत मागे टाकलं आहे. धवनने आपल्या वनडे करिअरमधील 5000 रन आज न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 10 रन करत पूर्ण केले. शिखर धवनने 119 सामन्यांमध्ये आणि 18 इनिंगमध्ये आपले 5000 रन पूर्ण केले. धवनने महान बॅट्समन ब्रायन लाराची बरोबरी केली आहे. ब्रायन लाराने वनडेमध्ये 5000 रन 118 इनिंगमध्ये पूर्ण केल्या होत्या. गांगुलीने 126 सामन्यांमध्ये 5000 रन केले होते. भारताकडून सर्वात जलद 5000 रन भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 114 सामन्यांमध्ये 5000 रन पूर्ण केले होते.
 
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 रन करणारा धवन पाचवा खेळाडू ठरला आहे. वनडेमध्ये सर्वात जलद 5000 रन दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हासिम आमलाच्या नावावर आहे. अमलाने 101 इनिंगमध्ये 5005 रन पूर्ण केले होते.
 

वनडे क्रिकेटमधील जलद 5000 रन

1. हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका) 101 इनिंग
2. विवियन रिचर्ड्सन (विंडीज) 114 इनिंग
3. विराट कोहली (भारत) 114 इनिंग
4. ब्रायन लारा (विंडीज) 118 इनिंग
5. शिखर धवन (भारत) 118 इनिंग
 
दरम्यान आज सुरु असलेल्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. 32 ओव्हरमध्ये त्यांनी 6 विकेट गमवत फक्त 140 रन केले होते. त्यानंतर न्यूझीलंडची संपूर्ण टीम 38 ओव्हरमध्ये 157 रनवर ऑलआऊट झाली. भारतासमोर 158 रनचं टार्गेट आहे.