Shikhar Dhawan : 'पठ्ठ्यांनो वर्ल्ड कप जिंकाच...', बीसीसीआयने दिला 'रेड सिग्नल' पण शिखरने काळीज जिंकलं!

ICC One Day World Cup : बीसीसीआयने आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र, यामध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) संधी मिळाली नाही. अशातच शिखरची एक पोस्ट चर्चेत आहे.

Updated: Sep 6, 2023, 09:54 PM IST
Shikhar Dhawan : 'पठ्ठ्यांनो वर्ल्ड कप जिंकाच...', बीसीसीआयने दिला 'रेड सिग्नल' पण शिखरने काळीज जिंकलं! title=
Shikhar Dhawan World Cup 2023 Squad

Shikhar Dhawan On World Cup Team : आज तेरा भाई करके दिखायेगा, असं ड्रेसिंग रुममध्ये म्हणत मैदानात उतरून धुरळा उडवणारा कोण एक खेळाडू असेल तर त्याचं नाव शिखर धवन (Shikhar Dhawan). बोट तुटलं तरी तासंतास मैदान गाजवणाऱ्या शिखर धवनला बीसीसीआयने रेड सिग्नल दिलाय. आयसीसीच्या इवेन्टमध्ये (ICC World Cup) सर्वात मोलाची कामगिरी करून दाखवलेल्या शिखरला डावललं गेल्याने आता तमाम क्रिडाप्रेमींचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळतंय. शिखरचा आयसीसीच्या मॅचेसमधील रेकॉर्ड कोणालाच न ऐकणारा... तरी देखील त्याला संघातून डच्चू देण्यात आल्याने अनेकांनी चीफ सिलेक्टर अन् रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका केली आहे. मात्र, चर्चा सुरू असतानाच आता शिखर धवनने सर्वांचं मन जिंकलं आहे.

शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या वनडे आणि टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये खेळताना दिसला नाही. सतत्याने त्याला डावललं जात असल्याचं दिसत आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी करून त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज किंवा आर्यलँड दौऱ्यात देखील डावललं गेलं. त्यामुळे आता बीसीसीआयने शिखर धवनला रेड सिग्नल दिलाय, हे नक्की... मात्र, अशातच आता शिखरने सोशल मी़डियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा - लाहोरच्या मैदानात 'बाबर बाबर'च्या घोषणा, तस्कीनने केला टप्प्यात कार्यक्रम अन् पाकड्यांची बोलती बंद; पाहा Video

काय म्हणाला शिखर धवन?

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या माझ्या सहकारी सहकारी आणि मित्रांचे अभिनंदन! 1.5 अब्ज लोकांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याने तुम्ही आमच्या आशा जिवंत ठेवा. प्रत्येक भारतीयाचं स्वप्नं पूर्ण करा. वर्ल्ड कप घरी आणा अन् आम्हाला अभिमान वाटू द्या, असं म्हणत शिखर धवनने टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, एक काळ असा होता जेव्हा 35 वर्षीय शिखर धवन टीम इंडियाचा मोठा मॅचविनर मानला जात होता. व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये धवन रोहितसोबत धावांचा डोंगर रचायचा. आता निवड समिती आणि मॅनेजमेंट शिखरला संधी देत नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये.