IPL Auction 2023 : IPL 2023 चा मिनी लिलाव शुक्रवारी पार पडला. कोची येथे पार पडलेल्या या लिलावात केवळ 80 खेळाडू विकले गेले. यामध्ये 29 खेळाडू परदेशी ठरले आहेत. या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांनी एकूण 167 कोटी रुपये खर्च केले होते. या लिलावानंतर मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारे अभिनेते शरद पोंक्षेंनी आक्षेप नोंदवला आहे.
अभिनेते शरद पोंक्षे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. राजकिय असो अथवा कोणत्याही विविध मुद्द्यांवर ते भाष्य करत असतात. आता नुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मीडियावर सडकून टीका केली आहे.या पोस्टमध्ये ते काय म्हणाले, ते जाणून घेऊय़ात.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो प्रसिद्ध क्रिकेटर अजिंक्य रहाणेचा आहे. या फोटोच्या खाली त्याच्या आयपीएल लिलावाची किंमत लिहली आहे. हा फोटो पोस्ट करून त्यांनी लिहलं की, विकत घ्यायला ती वस्तू आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर पुढे त्यांनी लिहले की, त्या खेळाडूच ते मानधन आहे.ते अशा विकृत पध्दतीन जाहीर करायला लाज कशी वाटत नाही? दळीद्री पत्रकारीता असे म्हणत त्याने मीडियावर आक्षेप नोंदवला.
देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने द्विशतक (Double Century) झळकावून आपलं नाणं खणखणीत बजावलं होतं. मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही.अजिंक्य रहाणेवर 50 लाखांची बोली लागली. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने अजिंक्यला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये आता तो पिवळया जर्सीत दिसणार आहे.