मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2021) च्या उपांत्य फेरीत (Semifinal) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पाकिस्तानचा दारूण पराभव झाल्यानंतर, बहुतेक लोक हसन अलीला दोष देत आहेत कारण त्याने निर्णायक क्षणी वेडचा (Matthew Wade) कॅच सोडला. मात्र शाहिद आफ्रिदीचे विचार थोडे वेगळे आहेत.
पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) 'बाबर आर्मी'च्या पराभवासाठी आपला जावई शाहीन शाह आफ्रिदीला (Shaheen Shah Afridi) जबाबदार धरले आहे. शाहीनच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स लागले.
शाहिद आफ्रिदी निराशेने म्हणाला की, 'मी शाहीनवर खूश नाही, हसन अलीने झेल सोडला याचा अर्थ असा नाही की पुढच्या ओव्हरमध्ये तुम्ही 3 सिक्स मारायला द्याल. त्याच्याकडे खूप वेगृ आहे आणि ऑफ-स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकण्याची समज त्याच्याकडे असली पाहिजे, परंतु त्याने मॅथ्यू वेडला पाहिजे तिथेच गोलंदाजी केली.
21 वर्षीय शाहीन आफ्रिदी सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या स्टार गोलंदाजांपैकी एक आहे, जो आपल्या देशासाठी कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतो. लवकरच तो पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. अलीकडेच शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा हिच्यासोबत त्याचे नाते निश्चित झाले आहे.