शाहिद आफ्रिदीच्या त्या रेकॉर्डला २१ वर्ष पूर्ण, तोडायला लागली १८ वर्ष

४ ऑक्टोबर १९९६ म्हणजे आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी पाकिस्तानचा बॅट्समन शाहिद आफ्रिदीनं विश्वविक्रम केला होता.

Updated: Oct 4, 2017, 05:33 PM IST
शाहिद आफ्रिदीच्या त्या रेकॉर्डला २१ वर्ष पूर्ण, तोडायला लागली १८ वर्ष  title=

मुंबई : ४ ऑक्टोबर १९९६ म्हणजे आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी पाकिस्तानचा बॅट्समन शाहिद आफ्रिदीनं विश्वविक्रम केला होता. १६ वर्षांच्या आफ्रिदीनं त्या दिवशी फक्त ३७ बॉल्समध्ये शतक झळकवण्याचा पराक्रम केला होता.

नैरोबीमध्ये खेळवण्यात आलेल्या कीसीए टूर्नामेंटच्या सहाव्या मॅचमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान आमने-सामने होते. टॉस हारून पहिले बॅटिंगला उतरलेल्या पाकिस्तानच्या टीमची पहिली विकेट पडल्यानंतर आफ्रिदी क्रीजवर आला.

मैदानामध्ये येताच आफ्रिदीनं फोर आणि सिक्सचा पाऊस पाडला. फक्त ५० मिनीटांमध्येच आफ्रिदीनं शतक पूर्ण केलं. सर्वात जलद शतक झळकवण्याचं आफ्रिदीचं हे रेकॉर्ड २०१४ साली म्हणजेच १८ वर्षांनी तुटलं. न्यूझीलंडच्या कोरे अंडरसननं वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त ३६ बॉल्समध्ये शतक झळकवलं होतं. त्यानंतर एकाच वर्षात कोरे अंडरसनचं रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं तोडलं. एबीनंही वेस्ट इंडिजविरुद्धच्याच मॅचमध्ये फक्त ३१ बॉल्समध्ये शतक झळकवलं. 

पाहा आफ्रिदीचं ते शतक