शाहिद अफ्रिदीची गौतमवर 'गंभीर' टीका

पाकिस्तान विरुद्ध 2007 ला झालेल्या वनडे मॅचदरम्यान गंभीर-आफ्रिदी यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली होती.

Updated: May 3, 2019, 06:04 PM IST
शाहिद अफ्रिदीची गौतमवर 'गंभीर' टीका title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर शाहिद अफ्रिदीने टीका केली आहे. आफ्रिदीने ही टीका त्याच्या आत्मचरित्रातून केली आहे. 'गेम चेंजर' असे त्याच्या आत्मचरित्राचे नाव आहे. गंभीर खूप अहंकारी आहे. गंभीरला नेहमीच त्याचा अंहकार अडवा येतो. अशा शब्दात अफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रातून टीका केली आहे.

आफ्रिदी आणि गंभीरमध्ये असलेले वैर हे सर्वश्रूत आहे. पाकिस्तान विरुद्ध 2007 ला झालेल्या वनडे मॅचदरम्यान गंभीर-आफ्रिदी यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली होती. रन घेताना आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात धडक झाली होती. या दरम्यान त्यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली होती.

'माझे गंभीर सोबत असलेले वैर हे वैयक्तिक आहेत. काही वेळेस वैर वैयक्तिक पातळीवर किंवा प्रोफेशनल पातळीवरचे असतात. गंभीर इतरांना एकाच नकारात्मक दृष्टीकोनाने पाहतो. त्याच्याकडे विशेष असे काही नाही. गंभीर हा अनेक महान खेळाडूंच्या यादीतील नमुना आहे. गंभीरच्या नावे विशेष अशा रेकॉर्डची नोंद नाही. त्याच्यात अंहकार हा ठासून भरला आहे. गंभीर जेव्हा क्रिकेट खेळायचा त्यावेळेस त्याच्यात नकारात्मकता असायची'. अशा शब्दात आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रातून तोफ डागली आहे.

अफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात २००७ ला आशिया कपमधील भारत-पाक मॅच दरम्यान घडलेल्या किस्सा सांगितला आहे. 'गंभीरने धाव पूर्ण केल्यानंतर तो माझ्या अंगावर आला. हे प्रकरण पंचांनी मध्यस्थी करुन सोडवणे अपेक्षित होते. आमच्यामध्ये अपशब्दांचा वापर देखील झाला'. अशी कबुली अफ्रिदीने दिली.

'मला साधे, आनंदी आणि सकारात्मक स्वभवाची माणसे आवडतात. आपल्या प्रतिस्पर्ध्यात वरील गुण असायला हवे. पण हे गुण गंभीरमध्ये नाही.' असं आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.