Gautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना

KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला. 

सौरभ तळेकर | Updated: May 27, 2024, 12:10 AM IST
Gautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना title=
Shah Rukh Khan kissed Gautam Gambhir forehead

Shah Rukh Khan kissed Gautam Gambhir forehead : मैदानात परिस्थिती कशीही असो तरीही मैदानाबाहेरून सुत्र हलवणारा कोच कधीही कोणाच्या नजरेत येत नाही. याचा प्रयत्त यंदाच्या हंगामात देखील पहायला मिळाला. कोलकाताचा कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला शिस्त लावली अन् अखेर आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात सर्वात मोठा हातभार लावला. अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण ठरलाय. अशातच आता फानयल सामना (IPL Final) जिंकल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी गौतम गंभीरला खांद्यावर उचलून घेतलं अन् जल्लोष साजरा केला. त्यावेळी केकेआरचा मालक किंग खानने देखील गंभीरचं कौतूक केलं.

आयपीएल फायनल जिंकल्यावर शाहरूख खानने मैदानात जल्लोष केला अन् केकेआरच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यावेळी गौतम गंभीर समोर दिसल्यावर किंग खानने गंभीरची कडकडून गळाभेट घेतली अन् गंभीरच्या माथ्यावर किस केली. त्यावेळी खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवत गंभीरला यशाचं योगदान दिलंय. गंभीर यंदाच्या हंगात केकेआरच्या खेळाडूंनी फ्री हँड दिलं अन् खेळाडूंनी देखील संधीचं सोनं करून दाखवलं.

गंभीर गंभीर म्हणतो...

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने शाहरुखचं कौतूक केलं होतं. मी आधीही बोललो होतो आणि आता सांगतोय, शाहरुखपेक्षा चांगल्या टीम ओनरसोबत मी कधीच काम केलेले नाही. त्यांना माहित आहे की हा एक खेळ आहे आणि कोणतेही रिटेक नाहीत. ते आपल्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. याशिवाय ते आमच्या निर्णयांचा आदर करतात, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.