नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्फोटक खेळाडू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या निवृत्तीची घोषणा युवराजने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान दिली. निवृत्तीच्या घोषणेनंतर युवराजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याच्या माजी सहकाऱ्यांनी तसेच चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील ट्वीटद्वारे युवराज सिंग सोबतचा खांदयावर हात टाकलेला एक फोटो ट्विट केला आहे.
सचिन तेंडुलकरने देखील युवराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने म्हटलं की, तुझी क्रिकेट कारकिर्द खूप छान होती. निर्णायक क्षणी तु टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. तुला तुझ्या २ इनिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी तुझे मनपूर्वक धन्यवाद.
What a fantastic career you have had Yuvi.
You have come out as a true champ everytime the team needed you. The fight you put up through all the ups & downs on & off the field is just amazing. Best of luck for your 2nd innings & thanks for all that you have done for Cricket.pic.twitter.com/J9YlPs87fv— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 10, 2019
अनेक खेळाडू येतील आणि जातील. पण युवराज सारखा खेळाडू शोधून सापडणार नाही. युवराजने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. आजारावर मात केली. बॉलर्सना धु-धु धुतलं. चाहत्यांची मनं जिंकली. आपल्या लढाईनं आणि इच्छाशक्तीने अनेकांचा प्रेरणा स्थान झाला. पुढील जीवनासाठी शुभेच्छा युवी.' अशा भावनिक शब्दात सेहवागने युवराजच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली.
Players will come and go,but players like @YUVSTRONG12 are very rare to find. Gone through many difficult times but thrashed disease,thrashed bowlers & won hearts. Inspired so many people with his fight & will-power. Wish you the best in life,Yuvi #YuvrajSingh. Best wishes always pic.twitter.com/sUNAoTyNa8
— Virender Sehwag (@virendersehwag) June 10, 2019