WTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण

Scenario required to reach WTC 25 Final: भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 13, 2024, 06:05 PM IST
WTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण title=

Scenario required to reach WTC 25 Final: नुकतंच टीम इंडियाने 4-1 अशा फरकाने इंग्लंडच्या टीमचा धुव्वा उडवला. यावेळी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) यादीत टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या दोन्ही वेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 

यावेळी भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship 2025 ) फायनलमध्ये तिसऱ्यांदा धडक देण्याची संधी आहे. जर टीम इंडियासा यंदाही  WTC ची फायनल गाठायची असेल तर कसं समीकरण असणार आहे, ते पाहुयात.

WTC फायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण

टीम इंडियाला जर तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळावयचं असेल तर आता 10 सामने उरले आहे. यावेळी टीम इंडियाला 10 सामन्यांपैकी 5 सामने जिंकावे लागणार आहे. याशिवाय इतर टीम्ससाठी हे समीकरण कसं आहे ते पाहूयात.

ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवून भारतीय टीमचा ताण वाढवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला आणि 2023-25 च्या जागतिक टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये स्थान मजबूत केलंय. या निकालानंतर WTC 2023-25 गुणतालिकेतीवर नजर टाकल्यास टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर 86.51 च्या विनिंग टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. 

इतर टीम्ससाठी तसं आहे WTC समीकरण

  • ऑस्ट्रेलिया - कांगारूंच्या टीमला 7 पैकी 4 टेस्ट सामने जिंकावे लागणार आहेत. 
  • भारत - टीम इंडियाकडे एकूण 10 सामने बाकी असून यामध्ये 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावा लागणार आहे.
  • दक्षिण आफ्रिका - दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 8 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
  • न्यूझीलंड - किंवींना 8 पैकी 6 टेस्ट सामने जिंकावे लागणार आहेत
  • पाकिस्तान - पाकिस्तानच्या टीमला आता 9 टेस्ट सामन्यांपैकी 7 टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. 
  • वेस्ट इंडिज - वेस्ट इंडिजला देखील 9 टेस्ट सामन्यांपैकी 7 टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
  • इंग्लंड - इंग्लंडकडे यावेळी 12 सामने बाकी असून सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणं अनिवार्य असणार आहे.
  • बांगलादेश - 10 पैकी 7 टेस्ट सामने जिंकावे लागतील
  • श्रीलंका - 11 पैकी 8 सामने जिंकणं गरजेचं असणार आहे