धोनीसारखी जलद विकेट किपिंग करणारी महिला क्रिकेटर

कोण आहे लेडी धोनी...

Updated: Jun 10, 2018, 08:34 PM IST
धोनीसारखी जलद विकेट किपिंग करणारी महिला क्रिकेटर title=

मुंबई : क्रिकेटमध्ये सगळ्यात अवघड काम असतं ते विकेटकिपिंग करणं. विकेटकीपरवा प्रत्येक बॉलला सतर्क राहावं लागतं. स्टंपिंग करण्यासाठी तो खूप चपळ असला पाहिजे. पुरुष क्रिकेटमध्ये महेंद्र सिंह धोनी फास्टेस्ट स्टंपिंग करणारा विकेटकीपर मानला जातो. आता महिला क्रिकेटमध्ये हा खिताब इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलरला दिला जाऊ शकतो. आधुनिक क्रिकेटमध्ये साराला 'लेडी धोनी' म्हटलं जाऊ शकतं. 

आयसीसी चॅम्पिनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात पहिल्या वनडेमध्ये सारा टेलरने ज्याप्रकारे स्टंप आउट केलं तो पाहण्यासारखं होतं. अतिशय जलद गतीने साराने स्टंपिंग केलं. पण इंग्लंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

पाहा व्हिडिओ