Sara Tendulkar : किसी का भाई किसी की जान...; MI-GT सामन्यापूर्वी सोशल मीडियावर साराच्या नावाची चर्चा

आयपीएलमधील आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल खेळताना दिसणार आहे तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून उतरणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आता 'किसी का भाई किसी की जान' ट्रेंड होतंय. 

Updated: Apr 25, 2023, 07:34 PM IST
Sara Tendulkar : किसी का भाई किसी की जान...; MI-GT सामन्यापूर्वी सोशल मीडियावर साराच्या नावाची चर्चा title=

Arjun Tendulkar : अहमदाबादच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. गेल्या सिझनमध्ये मुंबई विरूद्ध गुजरात (MI vs GT) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली होती. दरम्यान आजचा सामना जिंकण्यासाठी रोहित शर्मा (Rohit sharma) कोणच्या प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) टीममध्ये संधी देणार का हे पाहणं महत्वाचं आहे. अशातच सोशल मीडियावर आता 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan), हे ट्रेडिंग होताना दिसतंय.

आयपीएलमधील आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल खेळताना दिसणार आहे तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून उतरणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आता 'किसी का भाई किसी की जान' ट्रेंड होतंय. 

सारामुळे अर्जुन-गिल ट्रोल

यंदाच्या वर्षी अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. अर्जुनचा टीममध्ये समावेश होत असल्याने त्याची बहिण सारा तेंडुलकर त्याला सपोर्ट करण्यासाठी नेहमी स्टेडियममध्ये पोहोचते. दुसरीकडे सारा तेंडुलकरचं नाव हे टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलशी जोडलं जातं. त्यामुळे आज एकीकडे भाऊ तर दुसरीकडे कथित बॉयफ्रेंड, असा अंदाज युझर्सने लावला आहे. त्यामुळे सारासाठी आज 'किसी का भाई किसी की जान' यासंदर्भातील मीम व्हायरल होताना दिसतंय. 

अर्जुनने एकाच ओव्हरमध्ये लुटवले 31 रन्स

पंजाबविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने अगदी कहर केला. अर्जुनने वानखेडे म्हणजेच त्याच्या होम ग्राऊंडवर पहिली विकेट घेतली. मात्र त्याच्या या विकेटचा आनंद काही काळच टिकला. दरम्यान अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या 16 व्या ओव्हरमध्ये 31 रन्स खर्च केले. अर्जुनची 16 वी ओव्हर ही 6, Wd, 4, 1, 4, 6, N4, 4 अशी होती.