Sara Tendulkar: क्रिकेट जगतातील देवा मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने क्रिकेटमध्ये बरेच रेकॉर्ड केले आहेत. सचिनचे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. सचिनप्रमाणेच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील सध्या बरीच चर्चेत असते. आजकाल टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलसोबत साराचं नाव जोडलं जातं. मात्र साराच्या सोशल मीडियावरील पोस्ट (Social Media Post) पाहून साराचं शुभमन नव्हे तर एका दुसऱ्याच व्यक्तीसोबच अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर साराचे फोटो व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर एका मुलासोबत जबरदस्त पार्टीच्या मुडमध्ये दिसून येतेय. दरम्यान सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, की सारासोबत पार्टी करत असलेला हा मिस्ट्री बॉय नक्की कोण?
सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा (Sara Tendulkar) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह असते. सारा तिचे नवीन आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. साराने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये ती जोमात पार्टी करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोहत तिचा हा मित्र देखील आहे. गळ्यात हात टाकून सारा या मित्रासोबत जोरदार पार्टी करतेय. दरम्यान हा फोटो फार जुना असल्याचा अंदाज लावण्यात येतोय.
दरम्यान सारासोबत असलेला हा मिस्ट्री बॉय दुसरा तिसरा कोणी नसून ओरहान अवात्रामणि (Orhan Awatramani) आहे. त्याला त्याचे मित्र औरी म्हणून देखील हाक मारतात. औरी हा बॉलिवूड सेलिब्रेटींचा जवळचा मित्र मानला जातो. त्याचप्रमाणे ओहरान हा साराचा देखील जवळचा मित्र मानला जातो.
ओरी आणि साराच्या या फोटोनंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, सारा ओहरानला डेट करतेय. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि शुभनम गिल यांच्यात अफेअर असल्याची चर्चा आहे. शुभमन गिलची बहीण साराची बेस्ट फ्रेंड असल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं.
शुभमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसलाय. दरम्यान दोन वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 2021 मध्ये सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या दोघांच्याही दोन्ही फोटोंचं बॅकग्राऊंड एकच आहे.
या दोघांच्या पोस्टवरील हे दोन्ही फोटो पाहून पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र शुबमनने (Shubman Gill) वेलेंटाईचा टाईमिंग साधल्याचेही बोललं जातंय. सध्या शुबमनच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. दरम्यान याआधी 2020 मध्ये गिल आणि सारा तेंडुलकरने त्याच कॅप्शनसह एकाच वेळी फोटो पोस्ट केले. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.