सारा तेंडुलकर एक दिवस आधीच पोहोचली अहमदबादला, युजर्स म्हणतात, 'आता शुभमन गिलची..;

Sara Tendulkar in Ahmedabad: साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यावर यूजर्स शुभमन गिलचे नाव घेऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2023, 05:18 PM IST
सारा तेंडुलकर एक दिवस आधीच पोहोचली अहमदबादला, युजर्स म्हणतात, 'आता शुभमन गिलची..;  title=

Sara Tendulkar in Ahmedabad: 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम फेरीतील सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकची लाडकी लेकही गुजरातमध्ये आहे. सारा तेंडुलकर शनिवारी म्हणजेच मॅचच्या एक दिवस आधी अहमदाबादला पोहोचली. अहमदाबादला रविवारी वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे.  साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यावर यूजर्स शुभमन गिलचे नाव घेऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सारा तेंडुलकर वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचली. यानंतर'आता शुभमन गिलचे शतक निश्चित झाले आहे', अशी प्रतिक्रिया यूजर्स देत आहेत. 

सारा तेंडुलकरने शनिवारी तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट पोस्ट केली. वर्ल्ड कप 2023 अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचली असल्याचे तिने आपल्या फॉलोअर्सना सांगितले. साराचे नाव गेल्या काही दिवासंपासून युवा क्रिकेटर शुभमन गिलशी जोडले गेले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Sara Tendulkar in Ahmedabad For World Cup 2023 User Comment Shubhaman Gill hit Century

अहमदाबाद विमानतळावरून सारा तेंडुलकरचा फोटो बाहेर येताच लोकांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या. 'आता शुभमन फायनलमध्ये नक्कीच शतक झळकावेल'. सारा गेल्या काही सामन्यांपासून सतत स्टेडियममध्ये दिसत आहे. दुसरीकडे शुभमन गिलही आपल्या बॅटने धावा करत आहे. अशा परिस्थितीत सारा अहमदाबादला पोहोचल्याचे पाहून चाहते खूश आहेत. 

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरची चर्चा 
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर अनेकदा त्यांच्या कथित डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत असतात. साराही सध्या स्टेडियममध्ये जाऊन गिलला खूप चिअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघेही एका कार्यक्रमातून एकत्र येताना दिसले होते. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याच्या अफवा आजपर्यंत ना स्वीकारल्या आहेत ना नाकारल्या आहेत.