हातात ग्लास आणि सोबत 'तो'; Sara Tendulkar लंडनमध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या

नुकतंच सारा तेंडुलकर सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं समोर आलं आहे. 

Updated: Jun 12, 2022, 02:38 PM IST
हातात ग्लास आणि सोबत 'तो'; Sara Tendulkar लंडनमध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या title=

मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. सारा इंस्टाग्रामवर लोकप्रिय असून तिचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी सारा मैदानात दिसली होती, त्यावेळी साराच्या सौंदर्याचंही मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. नुकतंच सारा तेंडुलकर सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं समोर आलं आहे. 

लंडननंतर आता बीचवर सारा तेंडुलकर निवांत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतेय. सोशल मीडियावर साराने एक स्टोरी शेअर केली आहे. सिद्धार्थ केरकरची स्टोरी साराने शेअर केली असून दोघं बीचवर सुट्टीचा आनंद घेतायत.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी ती गोव्यात सुट्टीसाठी गेली होती त्यावेळी सिद्धार्थसोबत दिसली होती. यापूर्वीही दोघांचे लंडनमधील फोटो शेअर केले होते. तर आता पुन्हा एकदा ते एकत्र असल्याची चर्चा आहे.

सारा आणि सिद्धार्थ हे दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आलंय. 17 नोव्हेंबर 2021 मध्ये सिद्धार्थचं नाव चर्चेत आलं होतं. त्यावेळी साराने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता.

कोण आहे सिद्धार्थ

सिद्धार्थ केरकर हा इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. त्याचे जवळपास 85 हजार फॉलोअर्स आहेत. तो एक आर्टिस्ट असून उत्तम पेटिंग्स बनवतो.