Sanju Samson In Team India Squad : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा (India squad announced for South Africa tour) बीसीसीआयने केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच आता बीसीसीआयने (BCCI) संजू सॅमसन याला दिलेला शब्द देखील पाळल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला (Sanju Samson) साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता संजूच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
आशिया कपमध्ये संजूला संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर एशियन गेम्स आणि वर्ल्ड कपमधून देखील संजूला बाहेर ठेवण्यात आलं होतं. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी त्याला डावलल्यात आलं होतं. आता मात्र त्याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया संघाच्या घोषणेनंतर संजूशी बोलणी केली होती. त्यावेळी त्याला योग्य संधी दिली जाईल, असं सांगण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता बीसीसीआयने आपला शब्द पाळला आहे.
आणखी वाचा - IND vs SA : साऊथ अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, KL Rahul नवा वनडे कर्णधार!
वनडे वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता कर्णधारपदाची माळा कोणाच्या गळ्यात जाईल? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता रोहित आणि विराट यांनी बीसीसीआयकडे विश्रांतीसाठी वेळ मागितल्याने केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर साई सुदर्शन या तगड्या युवा फलंदाजाला संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर रिंकू सिंहला (Rinku Singh) पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळालं आहे. एवढंच नाही तर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांचं वनडेमध्ये जोरदार कमबॅक झालंय.
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
India’s squad for 3 ODIs: Ruturaj Gaikwad, Sai Sudharsan, Tilak Varma, Rajat Patidar, Rinku Singh, Shreyas Iyer, KL Rahul (C)(wk), Sanju Samson (wk), Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Mukesh Kumar, Avesh Khan, Arshdeep Singh, Deepak Chahar.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023