Rohit Sharma: रविवारी वानखेडेच्या मैदानावर (Wankhede Stadium) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि टीम डेविडने उत्तम फलंदाजी करत मुंबईच्या टीमसाठी विजय खेचून आणला. रविवारी मुंबईचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) वाढदिवस होता, त्यामुळे तो बर्थडेच्या दिवशी मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र रोहित (Rohit Sharma) 5 बॉल्समध्ये 3 रन करून माघारी परतला. पण यावेळी त्याच्या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. मात्र या गदारोळावर आता बीसीसीआयने (BCCI) स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे रोहित आऊट होता की नॉट आऊट हे स्पष्ट झालं आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) रविवारी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईचा (Mumbai Indians) सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) बोल्ड झाला. त्याच्या या विकेटवरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला. यावेळी रोहितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून विकेटकीपर संजूचा ग्लोज बेल्सला लागलं असल्याचं म्हटलं. ज्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) नॉट आऊट आहे, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे.
रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावेळी चाहत्यांनी रोहित शर्मा नॉट आऊट असल्याचं म्हटलंय. यावरून चाहते चांगलेच संतापले देखील होते. चाहत्यांनी या व्हिडीओवरून इतका गोंधळ घातला की, अखेर बीसीसीआयला याची दखल घ्यावी लागली.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या म्हणण्यानुसार संदीप शर्माचा बॉल स्टंपला लागला नाही. उलट संजूचे ग्लोज लागले आणि बेल्स पडले, परिणामी रोहितला आऊट देण्यात आलं. मात्र आता बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय की, बॉलमुळेच स्टंपवरील बेल्स खाली पडली.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या व्हिडीओनंतर तुम्ही देखील अंदाज लावू शकता की, रोहितच्या विकेटमध्ये कोणत्याही प्रकारची चिटींग झालेली नाही. बेल्सला संजूचे ग्लोज न लागला बॉल लागला आणि बेल्स खाली पडले. त्यामुळे राजस्थान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खरंच आऊट होता.
The dismissal that had the world talking!
’s th match had no shortage of drama #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR | @mipaltan | @rajasthanroyals | @ImRo45 | @IamSanjuSamson pic.twitter.com/qGOUNSiV6H
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2023
वाढदिवसाच्या दिवशी रोहित मोठी खेळी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र रोहितला फलंदाजीमध्ये जास्त कमाल नाही दाखवता आली. रोहित 5 बॉल्समध्ये 3 रन्स करून माघारी परतला.