अमेरिकन ओपनमधून सानिया-पेंग बाहेर

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुई पेंग यांचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलेय. 

Updated: Sep 9, 2017, 04:12 PM IST
अमेरिकन ओपनमधून सानिया-पेंग बाहेर  title=

न्यूयॉर्क : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुई पेंग यांचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलेय. 

सेमीफायनल्समध्ये सानिया-पेंग जोडीला स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस आणि चीन तैपेईच्या युंग चान जोडीकडून ४-६, ४-६ या दोन सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. 

दोन्ही सेटमध्ये सानिया-पेंग जोडीने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र ही आघाडी त्यांना शेवटपर्यंत टिकवता आली नाही. पहिल्या सेटमध्ये सानिया-पेंगने ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, हिंगीस-चानने डबल ब्रेकच्या मदतीने ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुढील तीनही पॉईंट जिंकत ६-४ ने सेट आपल्या नावे केला. 

दुसऱ्या सेटमध्येही सानिया-पेंगला ३-१ अशी आघाडी मिळाली होती. मात्र ही आघाडी त्यांनी गमावली आणि दुसऱ्या सेटमध्येही त्यांचा पराभव झाला.