Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) भव्य पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) साकारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांनी 'झी 24 तास'ला दिली. भारतरत्न हा पुरस्कार मिळालेल्या सचिनच्या आयुष्यातील हा भावूक क्षण आहे. त्यावर आता खुद्द सचिनने वक्तव्य केलं आहे. (Sachin Tendulkar remembered Achrekar Sir while talking about his own statue what he said know here)
हा एक मोठा सन्मान आहे, स्वतःला तिथं पाहणं थोडं विचित्र आहे पण मला खूप अभिमान आहे, असं सचिन म्हणाला आहे. ज्यावेळी मला हे कळालं हे माझ्यासाठी सरप्राईझ होतं. मला असं वाटतं की, हा मोठा सर्कल आहे. आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाचा प्रवास होता, असा भावना सचिनने (Sachin Tendulkar On Statue) व्यक्त केल्या आहेत.
माझ्या आयुष्यातील खास क्षण या मैदानावर गेलाय, जो 2011 चा वर्ल्ड कपचा फायनल सामना होता. मला आचरेकर सरांनी इथेच शिकवलं त्यामुळे मी क्रिकेट शिकलो. माझ्या आंतरराष्ट्रीय करियरचा शेवटचा सामना (Sachin Tendulkar Last Match) देखील याच मैदानावर खेळला गेला होता, त्यामुळे हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे, असं सचिनने म्हटलं आहे.
#WATCH | Mumbai: On his life-size statue being erected inside Wankhede stadium by MCA, Cricket legend Sachin Tendulkar says, "Pleasant surprise. My career started here. It was a journey with unbelievable memories. Best moment of my career came here when we won 2011 World Cup..." pic.twitter.com/OAHPP7QkSB
— ANI (@ANI) February 28, 2023
सचिन तेंडुलकर एक भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केलंय हे सर्वांना माहीत आहे. तो 50 वर्षांचा झाल्यावर हे MCA कडून कौतुकाची भेट (Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium) असेल, असं अमोल काळे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारणार
दरम्यान, 14 नोव्हेंबर 2013 ला वानखेडे स्टेडियमवरच सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar Last International Match) आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे.