Sara Tendulkar होणार या प्रसिद्ध घराण्याची सून, त्या फोटोमुळे एकच चर्चा ?

पण काही दिवसांरपूर्वीच समोर आलेल्या या फोटोने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 

Updated: Jan 7, 2022, 12:32 PM IST
Sara Tendulkar होणार या प्रसिद्ध घराण्याची सून, त्या फोटोमुळे एकच चर्चा ? title=

मुंबई :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या त्याची मुलगी सारा तेंडुलकरमुळे खूपच चर्चेत आहे. वैयक्तिक  आयुष्यामुळे सारा नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. 

काही दिवसांपूर्वी साराने मॉडेलिंग क्षेत्रात डेब्यू केला. त्यानंतर तिच्या पहिल्या मॉडेलिंग व्हिडिओची एकच चर्चा रंगली. आता मात्र ती आपल्या लव्ह लाईफमुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. 

सोशल मीडियावर साराने व्हेकेशन ट्रीपचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोचं कनेक्शन एका क्रिकेटरसोबत जोडलं जात आहे. त्याच कारण म्हणजे या प्रसिद्ध क्रिकेटरने देखील तासाभरात व्हेकेशन ट्रीपचा एक सिंगल फोटो शेअर करत आपण सुट्टीवर असल्याचं सांगितलं आहे. 

हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स ( KKR ) चा सलामीवीर शुभमन गिल आहे. अशी चर्चा आहे की, दोघेही सिक्रेट रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या बातम्याही अनेकदा अफवांच्या रूपाने व्हायरल होतात. मात्र डेटींगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली  नाही.

पण काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या या फोटोने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 

सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर काही मोजक्या क्रिकेटर्सना फॉलो करते, त्यापैकी एक शुभमन गिल देखील आहे. शुभमन गिलची बहीण शहनील गिल देखील साराच्या इंस्टाग्रामच्या फॉलो लिस्टमध्ये आहे. डेटींग बाबत कोणतेही उत्तर या दोन्ही स्टार्सकडून मिळालेले नसले तरी सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा होत असते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x