इंग्लंडमध्ये होणार सचिन तेंडुलकरची क्रिकेट अॅकेडमी

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेट अॅकेडमीची घोषणा केली आहे. 

Updated: Jul 18, 2018, 08:48 PM IST
इंग्लंडमध्ये होणार सचिन तेंडुलकरची क्रिकेट अॅकेडमी title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेट अॅकेडमीची घोषणा केली आहे. पण सचिन तेंडुलकरची ही क्रिकेट अॅकेडमी भारतात नाही तर इंग्लंडमध्ये असणार आहे. इंग्लंडमधल्या मिडलसेक्स क्लबसोबत सचिननं करार करून ही अॅकेडमी उभारली आहे. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी असं या अॅकेडमीचं नाव असणार आहे. या अॅकेडमीमध्ये ९ ते १४ वर्षांमधल्या खेळाडूंना क्रिकेटचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. सचिनबरोबरच अनेक दिग्गज क्रिकेटपटू या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतील.

६-९ ऑगस्टदरम्यान नॉर्थवूडच्या मर्चंट टेलर स्कूलमध्ये या अॅकेडमीचा पहिला कॅम्प होणार आहे. या कॅम्पनंतर लंडन आणि मुंबईमध्येही अशाचप्रकारचे कॅम्प भरवण्यात येणार आहेत. सचिन तेंडुलकरची ही अॅकेडमी क्रिकेटमध्ये कौशल्या असणाऱ्या पण परिस्थिती नसलेल्या मुलांना १०० टक्के स्कॉलरशीपही देणार आहे. फक्त चांगला क्रिकेटपटूच नाही तर चांगला माणूस घडवण्याचं या अॅकेडमीचं लक्ष्य असल्याचं सचिन म्हणाला आहे.