SA vs ENG: अरे क्रिकेट खेळतो की विटी दांडू? विकेटकीपरच्या बत्त्या गुल, Video तुफान व्हायरल!

SA vs ENG, Moeen Ali : शम्सीच्याया ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर अलीने (Moeen Ali One Hand Shot) एका हाताने रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी...

Updated: Feb 2, 2023, 05:20 PM IST
SA vs ENG: अरे क्रिकेट खेळतो की विटी दांडू? विकेटकीपरच्या बत्त्या गुल, Video तुफान व्हायरल! title=
SA vs ENG, Moeen Ali

Moeen ali, South africa vs England : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (SA vs ENG) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत आफ्रिकन संघाने 2-1 ने कब्जा मिळवलाय. पहिला आणि दुसरा सामन्यात इंग्लडला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात (South Africa vs England, 3rd ODI ) दमदार पुनरागमन करत इंग्लंडने 59 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि कर्णधार जॉस बटलर (jos butler) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, चर्चा होतेय, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली याची... (SA vs ENG Moeen ali stuns with bizarre one handed switch hit attempt fails miserably sports news)

सलामीवीर डेविड मलानने (Dawid Malan) देखील या सामन्यात दमदार शतक ठोकलं. त्यानंतर कॅप्टन जॉस बटलरने 131 धावांची वादळी खेळी केली. मलान बाद झाल्यावर मोईन अली (Moeen Ali) मैदानात आला. त्यावेळी मोईन अलीने 23 बॉलमध्ये 41 धावांची धुंवाधार खेळी केली. शेवटच्या काही षटकात वेगाने धावा केल्या. त्यावेळी मोईन अलीच्या एका नव्या शॉटची चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा - Hardik Pandya : पांड्याला कोणत्या गोष्टीचा गर्व? थेट धोनीशी तुलना करत म्हणाला...

नेमकं काय झालं?

साऊथ अफ्रिकन कॅप्टनने तबरेझ शम्सीला 44 वं षटक टाकण्याची जबाबदारी दिली. शम्सीच्याया षटकातील चौथ्या चेंडूवर अलीने (Moeen Ali One Hand Shot) एका हाताने रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. शम्सीच्या चेंडूवर विटी दांडू स्टाईलने मोईन अलीने बॅट फिरवली. त्यावेळी विकेटकीपर थोडक्यात वाचल्याचं देखील पहायला मिळालं.

पाहा Video - 

दरम्यान, अलीचा (Moeen Ali) हा शॉट पाहिल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या मोठा धक्का बसलाय. बॅट थोडी खाली असती तर विकेटकिपरचा कार्यक्रम झाला असता, असं नेटकरी म्हणताना दिसत आहे. त्यावेळी मोईन अलीने 8 चेंडूत 12 धावा केल्या होत्या. त्याचा हा धाडसी निर्णय पाहून अनेकांनी संताप देखील व्यक्त केलाय.