Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवताना दिसत आहे. फायनल सामन्यात त्याने सेंच्यूरी मारली आहे. सलग तीन सामन्यात सेंच्यूरी मारल्याने त्याने हॅट्ट्रूीक साधली आहे. ऋतुराजने फायनल सामन्यात 108 धावांची कर्णधार साजेशी खेळी केली आहे. गायकवाडच्या या खेळीने महाराष्ट्र संघाने फायनल सामन्यात मोठी धावसंख्या उभारली आहे.
हे ही वाचा : Dwayne Bravo ची IPL मधून निवृत्ती,आता चेन्नईत 'या' भूमिकेत दिसणार
ऋतुराज गायकवाडने सौराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात शतक ठोकले आहे. ऋतुराजने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या तुफानी खेळीने महाराष्ट्र अंतिम सामन्यात चांगली धावसंख्या उभी करू शकली आहे. ऋतुराजची ही सलग तिसरी सेंच्यूरी होती.
हे ही वाचा : Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा वादळी खेळी केली होती.आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले होती. ऋतुराजची डबल सेंच्यूरी हुकली असली तरी त्याच्या खेळीने क्रिकेट फॅन्सची मने जिंकली आहेत.
दरम्यान याआधी विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) द्विशतक ठोकले होते.गायकवाडने 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 सिक्सर मारले होते. तसेच याच सामन्यात त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले होते. अशी कामगिरी करून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या बळावर महाष्ट्राने 9 विकेट गमावून 248 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे सौराष्ट्र समोर 249 धावांचे आव्हान असणार आहे.
दरम्यान आता हे आव्हान सौराष्ट्र पुर्ण करते की महाराष्ट्र त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतो, हे पाहावे लागणार आहे. तसेच विजय हजारे ट्राफीवर कोणता संघ नाव करतो याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.