मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 211 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. सीएसकेने या सामन्यात 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल केले होते. यावेळी न्यूझीलंडचा खेळाडू डेव्हॉन कॉनवेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं. सामना जरी हरला असला तरीही सीएसकेच्या फलंदाजांनी यावेळी चांगली कामगिरी केली. पण या सामन्यातही मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नशीबाने त्याला काही साथ दिली नाही.
IPL 2022 मध्ये ऋतुराज गायकवाडची निराशाजनक कामगिरी दुसऱ्या सामन्यातही पहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध गायकवाड केवळ 1 रन्सवर रन आऊट झाला. दोन ओव्हर्सनंतर सीएसकेची 26-0 अशी स्थिती होती. परंतु गायकवाडच्या नशीबाने पुढच्या ओव्हरमध्ये साथ सोडली आणि रवी बिश्नोईच्या उत्तम थ्रोवर तो आऊट झाला.
बिष्नोईने यांनी डायरेक्ट हिट करायला गेला त्यावेळी गायकवाड किमान तीन फूट दूर होता. कधी कधी फलंदाजाचं नशीब चांगले असतं आणि डायरेक्ट हिट बसत नाही. पण गायकवाडच्या बाबतीत तसं अजिबात घडलं नाही. बिश्नोईचा थ्रो जबरदस्त बसला आणि ऋतुराज माघारी परतला.
आयपीएल 2021 ऑरेंज कॅप विजेता गायकवाड देखील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध फ्लॉप ठरला होता. त्यावेळी गायकवाडला चार बॉल्समध्ये भोपळाही फोडला आला नव्हता.
सध्यापर्यंत या सिझनमध्ये त्याने दोन सामन्यांत त्याने केवळ एक रन केला आहे. गायकवाडची ही कामगिरी अशीच सुरू राहिली तर आगामी सामन्यांमध्ये सीएसकेचा रस्ता कठीण असण्याची शक्यता आहे.