RCB vs DC: विराटच्या आरसीबीची गाडी सुसाट, पण दिल्लीला भोपळा फुटेना; बंगळुरूकडून लाजीरवाणा पराभव!

Royal Challengers Bangalore VS Delhi Capitals: विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीमुळे बंगळुरूला हा विजय नोंदवता आला आहे. तर विजयकुमार विशाख (Vijaykumar Vyshak) या नवख्या खेळाडूने 3 महत्त्वाचे गडी बाद करत दिल्लीचा गड फत्ते केलाय. तर दिल्लीचा 23 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे.

Updated: Apr 15, 2023, 07:20 PM IST
RCB vs DC: विराटच्या आरसीबीची गाडी सुसाट, पण दिल्लीला भोपळा फुटेना; बंगळुरूकडून लाजीरवाणा पराभव! title=
Royal Challengers Bangalore win Against Delhi Capitals by 23 runs

IPL 2023, RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bengaluru vs Delhi) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने (RCB) दुसरा नोंदवला आहे. पहिल्या दोन पराभवानंतर आता बंगळुरूची गाडी सुसाट निघाल्याचं पहायला मिळतंय. विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीमुळे बंगळुरूला हा विजय नोंदवता आला आहे. तर विजयकुमार विशाख (Vijaykumar Vyshak) या नवख्या खेळाडूने 3 महत्त्वाचे गडी बाद करत दिल्लीचा गड फत्ते केलाय. तर दिल्लीचा 5 वा लाजीरवाणा पराभव झाला आहे. (Royal Challengers Bangalore win Against Delhi Capitals by 23 runs)

रॉयल्सच्या (RCB) टीमने दिलेलं 175 धावांचा आव्हान पार करताना दिल्लीची सुरूवात मात्र निराशाजनक झाली. नेहमीप्रमाणे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) झिरो इम्पॅक्ट दिसून आला. तर मिशेल मार्श देखील शुन्यावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने देखील तंबूत जाण्याचा रस्ता पकडला. मनिष पांडे याने एकीकडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. बंगळुरूच्या गोलंदाजांनी वेळोवेळी विकेट घेत दिल्लीला पराभवाचं तोंड पुन्हा एकदा दाखवलं.

आणखी वाचा - Viral Video: RCB च्या फॅनने केला Brett Lee च्या गाडीचा पाठलाग; त्यानंतर जे काही झालं... तुम्हीच पाहा

त्याआधी, फलंदाजी करताना आरसीबीची सुरूवात दणक्यात झाली. विराट कोहली (Virat Kohli) आणि कॅप्टन डुप्लेसिसने आक्रमक सुरूवात करून दिली. डुप्लेसिस 22 धावा करत बाद झाला तर लोमरोरने 26 धावा केल्या. त्यानंतर मॅक्सवेलने आक्रमक 24 धावा केल्या. तर दुसरीकडे विराटने आणखी एक फिफ्टी ठोकली. अखेरीस शाहबाज अहमद आणि अनुज रावत यांनी बंगळुरूची धावसंख्या 174 वर पोहोचवली.

दरम्यान, मनिष पांडे (Manish Panday) मैदानात असताना दिल्ली सामना जिंकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हसरंगाने आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि मनिष पांडेला बाद केलं. त्याचबरोबर आणखी एक सामना दिल्लीने गमावला आहे. दिल्लीने यंदाच्या हंगामात सलग पाचवा पराभव पाहिला आहे. त्यामुळे आता चाहत्याच्या मनात नाराजीचं वातावरण पहायला मिळतंय.