रोहित शर्मानं सिक्स मारताच रणवीर सिंहने काय केलं पाहा व्हिडीओ

'रोहित...रोहित...', रणवीर सिंहचा स्टेडियममधील 'हा' व्हिडीओ तुम्ही चुकवला असेल तर नक्की पाहा 

Updated: May 7, 2022, 08:41 AM IST
रोहित शर्मानं सिक्स मारताच रणवीर सिंहने काय केलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : मुंबई विरुद्ध गुजरात झालेल्या सामन्यात रणवीर सिंह मुंबई टीमला चिअर्स करताना दिसला. गुजरात विरुद्ध सामन्यात मुंबईने 5 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबई टीमने गुजरातच्या हातून विजय खेचून आणला. एका ओव्हरने कमाल केली. या सामन्यात रणवीर सिंह मुंबई टीमचं मनोबल वाढवताना दिसला.

रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघाल्या. या सामन्यात 7 धावांनी रोहितचं अर्धशतक हुकलं. 28 बॉलमध्ये त्याने 43 धावा केल्या. रोहित शर्माने ठोकलेल्या सिक्सवर रणवीर सिंह खूप झाला. तो स्टेडियममध्ये आनंदाने उड्या मारताना दिसला. 

रणवीर सिंहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांच्या नजरा रणवीरकडे वळल्या. तर गुजरात टीमचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळालं. रणवीर सिंह मुंबई टीमला चिअरअप करताना दिसला. 

रोहित शर्मा पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना पाहून रणवीरला आनंद झाला. क्रिकेटप्रेमींनीही रोहितच्या बाजूने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माच्या बॅटमधून म्हणावे तेवढे रन निघत नव्हते. त्यामुळे सर्वांचं टेन्शन वाढलं होतं. मात्र रोहितला फॉर्ममध्ये आल्याचं पाहून क्रिकेटप्रेमी आणि रणवीर सिंह खूप खूश झाले आहेत.