Rohit Sharma Captaincy: सध्या टीम इंडिया ( Team India ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) तयारीमध्ये आहे. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढत करायची आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान नुकतंच आयपीएल ( IPL 2023 ) झाली असून या स्पर्धेमध्ये रोहित शर्माची कामगिरी काही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे आता त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे लवकरच रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) कर्णधारपद जाणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) एका अधिकाऱ्याने अपडेट दिलं आहे.
गेल्या 10 वर्षांपासून टीम इंडियाने एकंही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. दरम्यान सध्या रोहितचा स्वत:च्या खराब फॉर्म पाहता WTC च्या फायनल सामन्यामध्ये त्याच्या खेळावर आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ( BCCI ) कडून टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय टेस्ट टीमसाठी नवा कर्णधार नियुक्त करण्यासंदर्भात कोणतीही घाई करणार नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर टीम इंडियाला वेस्ट इंडिजसोबत सिरीज खेळायची आहे. याशिवाय वनडे वर्ल्डकपचं आयोजन भारतात होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कर्णधारपदाबाबत कोणताही बदल होणार नसल्याचं समोर आलंय.
यावेळी एका वेबसाईला बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या टेस्ट टीमसाठी कर्णधार शोधण्याची घाई नाहीये. एकंदरीत पाहिलं तर रोहित शर्मा फीट आहे. WTC फायनलचा निकाल काहीही असो रोहितचं भारतासाठी टेस्ट टीमच्या कर्णधारपदी असेल.
दरम्यान रोहित किती काळ टेस्ट क्रिकेट खेळत राहील याची आम्हाला खात्री नाही. दरम्यान यासंगर्भात वनडे वर्ल्डकपनंतर काही वेळाने आम्ही रोहितशी चर्चा करणार आहोत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
कर्णधारपदासाठी रोहित शर्मासमोर वय हे एक आव्हान ठरतंय. रोहित आता 36 वर्षांचा असून त्याला पुढे दीर्घ कर्णधार राहणं कठीण आहे. त्यामुळे रोहित अजून किती वर्ष खेळणार आणि कर्णधारपदी काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.