पाकिस्तानी चाहत्याचा सलाम...Rohit Sharma विराट कोहलीपर्यंत पोहोचवणार! काय आहे नेमकं प्रकरणं?

एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटण्याची संधी कशी मिळाली याबाबत सांगितलं आहे. 

Updated: Jul 22, 2022, 09:47 AM IST
पाकिस्तानी चाहत्याचा सलाम...Rohit Sharma विराट कोहलीपर्यंत पोहोचवणार! काय आहे नेमकं प्रकरणं? title=

लंडन : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा इंग्लंड दौरा यशस्वी ठरला. टीम इंडियाने यजमान इंग्लंडला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत केलं. दरम्यान यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटण्याची संधी कशी मिळाली याबाबत सांगितलं आहे. 

रोहित आणि सूर्यकुमार यादवसोबत काढला फोटो 

पाकिस्तानी चाहत्याने रोहित आणि सूर्यकुमार यादवसोबत एक व्हिडिओ शूट केला आणि फोटोही क्लिक केला. पाकिस्तानच्या एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अहमदने रोहितसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला आहे. अहमद म्हणाला, "मी माझ्या मित्रासोबत लंडनमध्ये होतो. माझ्या मित्राच्या ओळखीचा हॉटेल मॅनेजर आहे ज्याने आम्हाला जेवायला बोलावलं होतं.''

तो चाहता पुढे म्हणाला, 'मला कल्पनाही नव्हती की आपण रोहित शर्माला भेटू. आम्ही जेवण करत होतो. त्यानंतर अचानक हॉटेलमधील एका मुलाने आम्हाला सांगितलं की, रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे काही लोक जेवायला येत आहेत. आम्हाला प्रथम वाटलं की ही गंमत आहे.'

आम्ही त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आणि त्याच्या संभाषणाचा व्हिडिओ शूट केला. त्याच्याशी किमान 10-15 मिनिटं चर्चा झाली. तो खूप छान स्वभावाचा आहे, त्याच्यासोबत चांगला वेळ घालवला होता. तो आमच्याशी मित्रासारखा वागला, असंही चाहत्याने सांगितलं.

तो चाहता म्हणाला, 'मी त्यांना सांगितलं की, आम्ही पाकिस्तानचे आहोत. आमच्या देशातील लोकांना तुम्ही खूप आवडता. मी त्याचा आणि विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. यावेळी रोहितने मला विराटला माझा हाय सांगणार असल्याचं म्हटलं आहे.