मुंबई : टी-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी टीम इंडियाचा इंग्लंड दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत पहिल्या टी-20 सामन्यात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. त्याचबरोबर दुसऱ्या टी-20 सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंचं कमबॅक होणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसतेय. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात इशान किशनने त्याच्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. अशा परिस्थितीत दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा किशनला टीमबाहेर बसवण्याचा निर्णय घेऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात इशान किशन केवळ 8 रन्स करून बाद झाला. रोहित शर्मा मोठे फटके मारत असताना इशान किशन रन्स काढण्यासाठी धडपडताना दिसला. तो टीमला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. त्याचवेळी आयर्लंड दौऱ्यावरही यशस्वी होऊ शकला नाही.
अशा स्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत नाही. यामुळे दुसऱ्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सलामीसाठी ईशान किशनच्या जागी दीपक हुड्डा प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी देऊ शकतो.
रोहित शर्मा जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असल्यावर तो समोरच्या टीमसाठी धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत दीपक हुड्डा त्याच्यासोबत ओपनिंगसाठी उतरला तर रन्सचा पाऊस पडू शकतो. दोन्ही खेळाडू विकेट्सच्या दरम्यान खूप चांगला खेळ करतात. अशा स्थितीत टीम इंडियाला नवी सलामी जोडी मिळू शकते.