IPL नंतर थकवा घालवण्यासाठी पत्नीसोबत मालदीवला पोहोचला रोहित

IPL मधून OUT झाल्यानंतर पत्नीसोबत सुट्टीचा आनंद घेतोय रोहित, रोमाँटिक फोटो व्हायरल

Updated: May 25, 2022, 12:35 PM IST
IPL नंतर थकवा घालवण्यासाठी पत्नीसोबत मालदीवला पोहोचला रोहित title=

मुंबई : विराट कोहलीसोबत रोहित शर्मा देखील खराब फॉर्मशी झुंज देत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आणि सलग दुसऱ्या वर्षी मुंबई टीमने अत्यंत वाईट कामगिरी केली. मुंबई टीम प्लेऑपर्यंतही पोहोचू शकली नाही. 

आता प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा पत्नीसोबत खास क्षणांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला पोहोचला आहे. हृतिका, रोहित आणि त्यांची मुलगी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्माची मुंबई टीम पहिल्या 10 सामन्यातच प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर रोहित शर्माने आता सुट्टीसाठी आणि थोडा थकवा घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे.

रोहित शर्माने आपल्या पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुढच्या काही दिवसांसाठी बस्स फक्त मला एवढाच अमूल्य क्षण आणि वेळ पाहिजे असं त्याने हृतिकासोबत फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे. 

रोहितने मुलीसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका आणि आर्यलंड विरुद्ध सीरिज भारताला खेळायची आहे. या सीरिजसाठी दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. इंग्लंड विरुद्ध सीरिजसाठी सीनियर खेळाडू पुन्हा मैदानात उतरतील असं सांगण्यात आलं आहे.