Rohit Sharma: रविवारी रात्री सर्व देशवासीयांना अनपेक्षित असणारी गोष्ट घडली. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 6 विकेट्सने भारताचा त्यांच्याच घरी पराभव केला. या विजयासह कांगारूंनी 6 व्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो ट्रेविस हेड.
ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपचा किताब पटकावला. यावेळी हेडला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. जिंकल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय. ट्रेविस हेडचं हे विधान हिटमॅनच्या चाहत्यांना रूचणार नाही.
वर्ल्डकपच्या विजयानंतर ट्रेविस हेड म्हणाला की, हा एक अद्भुत दिवस होता. मी याचा भाग असल्याने मला खूप आनंद झाला. घरी बसून वर्ल्डकप पाहण्यापेक्षा मैदानावर खेळणे चांगलं मानतो. मी थोडा घाबरलो होतो पण मार्नसने खूप चांगला खेळ केला. त्याने खेळाचं सर्व दडपण स्वतःवर घेतलं. मला वाटले की मार्शने ज्या प्रकारे खेळ केला त्यामुळे आमच्या विजयाचा टोन सेट झाला. आम्हाला असाच उत्साह हवा होता.
सामन्यानंतर ट्रेविस हेडने रोहित शर्माबाबत मोठं विधान केलं आहे. "टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चांगला होता. वर्ल्ड्कप फायनलमधील ओपनर्सच्या यादीत तिसरा आणि योगदान दिल्याने मला बरं वाटलं. मला असं वाटतं की रोहित शर्मा कदाचित जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे, असं हेडने म्हटलं आहे.
वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजीला आलेली भारतीय टीम रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केवळ 240 रन्स करू शकली. यावेळी केएल राहुलने 107 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी तर विराट कोहलीने 54 रन्सची खेळी खेळली. कर्णधार रोहित शर्माने 31 बॉल्समध्ये 47 रन्स केले. तर सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली.
टीम इंडियाने दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना रोहितने मोहम्मद शमीला सुरूवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आणलं अन् शमीने कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन विकेट्स काढल्या. मात्र त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवलं. अखेरीस 6 विकेट्सने फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला.