IND vs WI : सिरीज जिंकल्यानंतरही संतापला रोहित शर्मा, म्हणाला...

सलग दोन सिरीज जिंकूनंही रोहित शर्मा खूश दिसला नाही. सामन्यानंतर रोहितने टीमची सर्वात मोठा विक पॉईंट सांगितला आहे.

Updated: Feb 19, 2022, 09:59 AM IST
IND vs WI : सिरीज जिंकल्यानंतरही संतापला रोहित शर्मा, म्हणाला... title=

मुंबई : भारतीय टीमने वनडे सिरीजनंतर आता टी-20 सिरीजंही जिंकली आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 8 अवघ्या 8 रन्सने वेस्ट इंडिजवर विजय मिळवलाय. कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा सलग पाचवा विजय होता. मात्र सलग दोन सिरीज जिंकूनंही रोहित शर्मा खूश दिसला नाही. सामन्यानंतर रोहितने टीमची सर्वात मोठा विक पॉईंट सांगितला आहे.

सामन्यानंतर रोहित शर्माने विकेटकीपर ऋषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांचं कौतुक केलं. त्याचप्रमाणे भुवनेश्वर कुमारने अनुभवाचा वापर करून चांगली कामगिरी केली असल्याचं रोहितने सांगितलंय.

दरम्यान विराट कोहली संदर्भात रोहितने एक मोठं विधान केलं आहे. रोहित म्हणाला, "त्यावेळी अडचण आली मात्र अनुभव एक मोठी आणि महत्त्वाची भूमिका पार पाडतो. विराटने एक चांगली खेळी खेळली. त्याने माझ्यावर असलेलं दडपण बाजूला केलं."

रोहित पुढे म्हणाला, "आमची फिल्डींग काही प्रमाणात कमकुवत राहिली. यामुळे थोडी निराशा झाली. जर आम्ही चांगली फिल्डींग करत कॅच पकडले असते तर खेळाचं चित्र पालटलं असतं."

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. रोहित सेनेने विंडिजला विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र विंडिजला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे.