Team India मध्ये का होतायत वारंवार बदल; अखेर Rohit Sharma चा खुलासा

आता कर्णधार रोहित शर्माने आपल्या टीमबद्दल मोठं वक्तव्य केलंय. 

Updated: Aug 11, 2022, 08:38 AM IST
Team India मध्ये का होतायत वारंवार बदल; अखेर Rohit Sharma चा खुलासा title=

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या उत्कृष्ट कामगिरी करतेय. नुकतंच भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सिरीज जिंकली. त्याआधी इंग्लंड दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मध्ये विजयाचा झेंडा फडकवला होता. आता भारतीय टीमच्या नजरा खास आशिया चषक आणि टी-20 वर्ल्डकपवर खिळल्या आहेत.

आता कर्णधार रोहित शर्माने आपल्या टीमबद्दल मोठं वक्तव्य केलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करणं आवश्यक असल्याचं मत रोहित शर्माने व्यक्त केलंय. गेल्या T20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, भारत सतत टीममधील खेळाडूंवर प्रयोग करताना दिसतोय. यासाठी टीममध्ये वारंवार बदल केले जातायत.

स्टार स्पोर्ट्सच्या 'फॉलो द ब्लूज' या कार्यक्रमात रोहित म्हणाला, 'आम्ही खूप क्रिकेट खेळतो, त्यामुळे दुखापत आणि कामाचा स्ट्रेस मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. अशा स्थितीत खेळाडूंना रोटेट करावं लागतं. रोटेट केल्याने आमच्या बेंच स्ट्रेंथला मैदानावर खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही अनेक खेळाडू आजमावू शकतो.

रोहित पुढे म्हणाला, 'आम्हाला आमची बेंच स्ट्रेंथ तयार करायची आहे, आम्हाला टीमचं भविष्य सुरक्षित हातात आहे हे निश्चित करायचंय. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय." 

कोचसोबत चर्चा केलीये

रोहिच्या म्हणण्याप्रमाणे, 'मला माहित नाही की पुढे जाण्याची काय अपेक्षा करू. राहुल द्रविड टीमचे कोच झाल्यावर आम्ही एकत्र बसून टीमला पुढे नेण्याच्या योजनेवर चर्चा केलीये. त्यांची विचारसरणी माझ्यासारखीच आहे आणि त्यामुळे माझं काम सोपं झालं आहे.