Rohit Sharma : कांगारूंनी आता हद्दच केली...; Rohit Sharma आऊट झाल्यानंतर भर मैदानात उडवली खिल्ली!

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला स्लेजिंग करताना दिसतायत. 

Updated: Mar 2, 2023, 05:16 PM IST
Rohit Sharma : कांगारूंनी आता हद्दच केली...; Rohit Sharma आऊट झाल्यानंतर भर मैदानात उडवली खिल्ली! title=

Rohit Sharma sledged Video: मराठीमध्ये अशी म्हण आहे ती म्हणजे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडचं. असंच काहीसं ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमचं (Australia Team) आहे. कधी स्लेजिंग (sledging) तर कधी चिटींग करणं हे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमला अगदी चांगलं जमतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नुकतीच याची प्रचिती भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये पहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या टीमने खेळ सुधारण्यापेक्षा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) स्लेजिंग केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

कर्णधार रोहित शर्मासोबत स्लेजिंग

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला स्लेजिंग करताना दिसतायत. 

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma sledged Video) फ्लॉप ठरला. पहिल्या डावाप्रमाणे या डावातंही त्याने केवळ 12 रन्सची खेळी केली. दुसऱ्या डावामध्ये नाथन लियोनचा बॉल सरळ शर्माच्या पॅडवर जाऊन लागला. यावेळी रोहितने फिल्ड अंपायरच्या विरोधात जाऊन डीआरएस घेतला. याचवेळी रोहित आणि चेतेश्वर पुजारा एकत्र उभे असताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नाथन लियोनला घेर करून उभे राहिले. 

अशातच ऑस्ट्रेलियाचा ओपनर ट्रेविस हेड (Travis Head) रोहित शर्मा (Rohit Sharma sledged by Travis Head) जवळ आला आणि जोरजोरात टाळ्या वाजवून निघून गेला. ट्रेविस हेड रोहितला चिडवण्याच्या हेतून आला होता. यानंतर सोशल मीडियावर हेडवर प्रचंड प्रमाणात टीका केली जातेय. 

रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप

नागपूर टेस्टच्या पहिल्या डावात 120 रन्स करणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) ची बॅट या सिरीजमध्ये काही चांगली कामगिरी करू शकली नाही. इंदूर टेस्टमध्ये दोन्ही डावांमध्ये रोहितने केवळ 12 रन्स केले आहेत. पहिल्या डावात मॅथ्यू कुनहेमॅन तर दुसऱ्या डावात नाथन लियोनचा तो शिकार बनला. या सामन्यामध्ये रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याला चांगला खेळ करता आला नाही. 

ऑस्ट्रेलियाला 76 रन्सचं आव्हान

टीम इंडियाचा दुसरा डावंही गडगडला. दुसऱ्या डावात 163 रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली. यावेळी टीम इंडिया 75 रन्सची आघाडी घेतली असून कांगारूंना तिसरी टेस्ट जिंकण्यासाठी 76 रन्सचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावामध्ये चेतेश्वर पुजाराची बॅट केवळ तळपली. पुजाराने शानदार हाफ सेंच्युरी झळकावत 59 रन्सची खेळी केली.