आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की....; सलग चौथ्या पराभवानंतर Rohit Sharma अखेर हताश

रॉयल चॅलेंजर बंगळूरू सोबत झालेला पराभव मुंबईचा सलग चौथा पराभव होता.

Updated: Apr 10, 2022, 11:14 AM IST
आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की....; सलग चौथ्या पराभवानंतर Rohit Sharma अखेर हताश title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये 4 सामने खेळूनही मुंबई इंडियन्सला अजून सूर गवसलेला नाही. रॉयल चॅलेंजर बंगळूरू सोबत झालेला पराभव मुंबईचा सलग चौथा पराभव होता. आरसीबीने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला. दरम्यान सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रोहित शर्माने या पराभवासाठी स्वतःला जबाबदार धरलं आहे.

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "आम्हाला आमची फलंदाजी मजबूत करायची होती, पण आमचं दुर्देव म्हणावं लागेल की, आमच्याकडे काही परदेशी खेळाडू होते जे उपलब्ध नव्हते. त्यामुळे आमच्याकडे आता जे काही आहे त्यातून आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची होती. मला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करायची होती, पण दुर्दैवाने मी चुकीच्या वेळी आऊट झालो."

आम्ही फक्त 50 रन्सची पार्टनरशीप करू शकलो शकलो आणि मी चुकीच्या वेळी बाद झालो. ज्याचा फटका आम्हाला बसला. हे पीच 150 रन्सचं नव्हतं. सूर्याने आम्हाला दाखवून दिलं की, जर तुम्ही समजूतदारपणे फलंदाजी केली तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. 150 पर्यंत स्कोर नेण्याचं श्रेय सूर्याला जातं, असंही रोहित शर्मा म्हणाला.

यल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावाचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये  3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.