दुखापतग्रस्त Rohit Sharma परतणार भारतात; टेस्ट सिरीज खेळण्यावर प्रश्नचिन्ह

रोहित शर्मा देशाला गरज होती म्हणून तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्या वनडे (IND Vs BAN 3rd ODI) सामन्यातून तो बाहेर झाला असून तो मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे.  

Updated: Dec 8, 2022, 04:09 PM IST
दुखापतग्रस्त Rohit Sharma परतणार भारतात; टेस्ट सिरीज खेळण्यावर प्रश्नचिन्ह title=

IND Vs BAN 3rd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) दुखापतग्रस्त (Injury) असूनही तुफान फलंदाजी केली. कालच्या सामन्यात त्याने विजय भारताच्या (India) बाजूने खेचून आणला होता. बांगलादेशविरूद्धच्या (Ind vs Ban) दुसऱ्या सामन्यात फिल्डींगदरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. मात्र तरीही देशाला गरज होती म्हणून तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्या वनडे (IND Vs BAN 3rd ODI) सामन्यातून तो बाहेर झाला असून तो मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे.  

भारताचे प्रमुख कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सामन्यानंतर माहिती देताना सांगितलं की, कुलदीप, दीपक आणि रोहित शर्मा पुढच्या सामन्यातून निश्चित स्वरूपात बाहेर राहणार आहे. दरम्यान याबाबत तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊन तो टेस्ट सिरीज खेळणार की नाही, याचा विचार करणार आहे. आताच सगळं सांगणं घाईचं ठरेल. मात्र हे तिघंही खेळाडू तिसऱ्या वनडे सामन्यात खेळणार नाहीत.

रोहित शर्माला दुखापत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. रोहित शर्मा यापुढे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही आणि कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

रोहितची तुफान फलंदाजी

दुसरा वनडे सामना संपला असं वाटत होतं मात्र रोहित शर्मा 10 व्या क्रमांकावर खेळायला आणि सामन्यात पुन्हा ट्विस्ट आला. मात्र रोहितने आल्यावर तुफान फटकेबाजी केली, अवघ्या 28 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या षटकात 20 धावांची गरज होती. रोहितने दोन चौकार मारले, मात्र एक चेंडू वाईड गेला. भारताला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज होती, रोहितने सिक्स खेचत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं मात्र पुढच्या चेंडू यॉर्कर टाकत रहमानने सामना जिंकून दिला.  

रोहितशिवाय दीपक चहर आणि कुलदीप सेन दोन खेळाडूही मुंबईला परतणार आहेत. दुसरा एकदिवसीय सामना खेळत असलेला दीपक हॅमस्ट्रिंगच्या समस्येशी झुंजत आहे, तर अनकॅप्ड खेळाडू कुलदीप सेनला पाठीला दुखापत झाली आहे.