IPL 2021 : मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा या खेळाडूला पाहून का घाबरतो?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगची चमकदार ट्रॉफी जवळजवळ पाच वेळा आपल्या नवावर करुन विक्रम केला आहे.

Updated: Apr 21, 2021, 09:37 PM IST
IPL 2021 : मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा या खेळाडूला पाहून का घाबरतो? title=

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगची चमकदार ट्रॉफी जवळजवळ पाच वेळा आपल्या नवावर करुन विक्रम केला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय टी -20 लीगच्या सर्वाधिक धावा करणाऱ्यां फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचे नाव पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आहे. मग असे काय आहे की, सध्याच्या सीझनमध्ये चार सामने खेळूनही रोहितला एकदाही 50 धावांचा आकडा गाठता आला नाही.

रोहितने जरी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यासीझनमधील सर्वाधिक धावा केल्या आहेत, परंतु ज्या पद्धतीने त्याने घाबरून आपला विकेट घालवला, ते पाहूण एक गोष्ट तर लक्षात येते की, असा एक खेळडू आहे ज्याला पाहूण रोहितला घाम फुटतो.

या सामन्यात रोहित शर्माने दिल्ली कॅपिटलच्या विरूद्ध 30 चेंडूत 44 धावा केल्या. यात त्याने 3 चौके आणि 3 सिक्स मारले. जेव्हा या सामन्यात रोहित मैदानात उतरला तेव्हा तो मोठा डाव खेळेल अशी सर्वांना आशा होती. परंतु या एका गोलंदाजा समोर तो टिकू शकला नाही. बर्‍याचदा रोहितचा विकेट घेण्यासाठी एक खेळाडू नेहमीच तयार असतो. हा खेळाडू आहे लेगस्पिनर अमित मिश्रा. मिश्राने आयपीएलमध्ये सातव्यांदा रोहितला बाद केले आहे. ते ही अवघ्या 13 सामन्यात.

मिश्राचे 4 ओव्हरमध्ये 4 बळी

या सामन्यात रोहित शर्मा अमित मिश्रा समोर सेट झाला नव्हता किंवा त्याच्या समोर रोहिने फटके बाझी देखील केली नाही. तो ज्या बॅालवर आऊट झाला होता, तो बॅाल मिश्राने शरीराबाहेर टाकला होता. खेळाच्या 9 व्या ओव्हरमधील अमित मिश्राच्या चौथ्या बॅालवर रोहितने  सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅाल शरीरापासून दूर असल्याने त्याला लांबपर्यंत मारता आले नाही. त्यामुळे स्मिथने रोहितची कॅच घेऊन त्याला आऊट केले.

मिश्राने केवळ रोहितचाच विकेट घेतला नाही तर, मुंबई इंडियन्समधील आणखी तीन बळी घेतले. रोहित व्यतिरिक्त मिश्राने इशान किशन, हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डचाही विकेट घेतला. मिश्राने चार ओव्हरमध्ये केवळ 24 धावा देऊन 4 बळी घेतले.