Rohit sharma : 1 रन करूनही हिटमॅनची कॉलर टाईट; नव्या विक्रमाला गवसणी

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यामध्ये सामना होता. बंगळूरूचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहित शर्मा तर अवघा 1 रन्स करून माघारी परतला. मात्र तरीही त्याच्या नावे एका रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Updated: Apr 2, 2023, 10:19 PM IST
Rohit sharma : 1 रन करूनही हिटमॅनची कॉलर टाईट; नव्या विक्रमाला गवसणी  title=

MI vs RCB : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये सामना रंगला आहे. या सामन्यात तिलक वर्माशिवाय (Tilak Varma) एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma), सूर्यकुमार यादव, इशान किशन शिवाय कॅमरून ग्रीन देखील फेल ठरताना दिसले. रोहित शर्मा तर अवघा 1 रन्स करून माघारी परतला. मात्र तरीही त्याच्या नावे एका रेकॉर्डची नोंद झाली आहे.

हिटमॅनच्या नावे नवा रेकॉर्ड

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यामध्ये सामना होता. बंगळूरूचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सच्या टीमची खराब फलंदाजी पहायला मिळाली. टीमचा कर्णधार रोहित शर्मा एका रन्सवर बाद झाला. मात्र असं असूनही एका रनद्वारे त्याने एक मोठा पराक्रम केला आहे.

आजच्या सामन्यात रोहितला मोठी धावसंख्या करता आली नाही. मात्र तरीही मुंबई इंडियन्सचा ओपनर म्हणून रोहित 2000 रन्स करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. तर रेकॉर्ड लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव आहे. सचिनच्या नावे मुंबई इंडियन्सचा ओपनर म्हणून सर्वाधिक म्हणजेच 2227 रन्सची नोंद केली आहे.

मुंबईचे फलंदाज पहिल्याच सामन्यात फेल

20 ओव्हर्समध्ये मुंबईच्या टीमने 7 विकेट्स गमावले. यावेळी मुंबईच्या चार फलंदाजांना केवळ दुहेरी धावसंख्या गाठता आली.  यावेळी कॅमेरून ग्रीन आणि हृतिक शोकीन पाच रन्सवर बाद झाले. टीम डेव्हिडने 10 चेंडूत चार आणि कर्णधार रोहित शर्माने 1 रन केला. याशिवाय निहाल बधेराने 13 चेंडूत 21, सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 15, इशान किशनने 13 चेंडूत 10 तर अर्शद खानने नऊ चेंडूत नाबाद 15 रन्स केले. त्यामुळे पहिल्याच सामन्यात मुंबईच्या टीमचा खराब खेळ पहायला मिळाला. 

दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

रॉयल चैलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॉक्सवेल, माइकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टोप्ले, मोहम्मद सिराज।

मुंबई इंडियंस: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कैमरून ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, निहाल वधेरा, ऋतिक शॉकीन, पीयूष चावला, जोफ्रा आर्चर, अरशद खान