टीव्हीवर Rohit Sharma जाड दिसतो...; हिटमॅनच्या फिटनेसवर संतापले कपिल देव!

कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, फीट राहणं गरजेचं आहे आणि एका कर्णधारासाठी हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही फीट नाही आहात तर ही शरमेची बाब आहे. 

Updated: Feb 23, 2023, 07:05 PM IST
टीव्हीवर Rohit Sharma जाड दिसतो...; हिटमॅनच्या फिटनेसवर संतापले कपिल देव! title=

Rohit Sharma Fitness : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसवरून (Fitness) नेहमी प्रश्न उपस्थित होताना दिसतात. यावरून अनेकदा रोहित शर्मा ट्रोलही (Rohit Sharma troll) होताना दिसतो. दरम्यान यावेळी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी रोहितला त्याच्या फीटनेसवरून कान टोचले आहेत. कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, फीट राहणं गरजेचं आहे आणि एका कर्णधारासाठी हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही फीट नाही आहात तर ही शरमेची बाब आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसबाबतीत एका इंटरव्ह्यूमध्ये कपिल देव यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी कपिल देव म्हणाले, तो एक महान फलंदाज आहे. मात्र फिटनेसची गोष्ट कराल, तर तो टीव्हीवर मला जाडा दिसतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला टीव्हीवर पाहता आणि वास्तवात पाहता तेव्हा यामध्ये खूप फरक असतो. 

कपिल पुढे म्हणाले, मात्र मी जे काही पाहतो, त्यावरून तो एक महान खेळाडू आहे. त्यामुळे रोहितला फीट राहण्याची फार गरज आहे. विराटला बघा, जेव्हा तुम्ही त्याला पाहता, तेव्हा आपण म्हणतो, हा फिटनेस आहे...!

यापूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये कपिल देव यांनी सांगितलं होतं की, रोहित त्याच्या क्रिकेट कौशल्याचा विचार करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे, मात्र त्याच्या फिटनेसबद्दल असं म्हणता येणार नाही. रोहित शर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्याच्याकडे सर्व काही आहे पण माझ्या मते, त्याच्या फिटनेसवर मोठं प्रश्नचिन्ह आहे.

रोहित तो पुरेसा फिट आहे का? कारण कर्णधार असा असावा जो इतर खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी प्रेरित करतो, असंही कपिल देव म्हणाले होते. 

दरम्यान कपिल देव यांच्या या वक्तव्याचं अनेक चाहत्यांनी देखील समर्थन केलं आहे. चाहतेही अनेकदा रोहितला फिट राहण्याचा सल्ला देत असतात. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत 2023 च्या वनडे वर्ल्डकपच्या यजमानपदासाठी सज्ज आहे. ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान हा वर्ल्डकप रंगणार आहे. 

रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या वनडेतून बाहेर

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडेसाठी बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आल्यानुसार, केवळ पहिल्या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थितीत असणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी टीमच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माच टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे. 

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या वनडेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सिरीजमध्ये उत्तम खेळ करत शतक झळकावलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला त्याची उणीव भासू शकते.