आम्ही तुझा विचारही...; युझवेंद्र चहलच्या तोंडावर Rohit Sharma ने केला अपमान

युझवेंद्र चहल आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Updated: Sep 28, 2022, 11:50 AM IST
आम्ही तुझा विचारही...; युझवेंद्र चहलच्या तोंडावर Rohit Sharma ने केला अपमान title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल त्याच्या फनी स्टाइलसाठी ओळखला जातो. युझवेंद्र चहल देखील चहल टीव्हीवर सहकारी खेळाडूंची मुलाखत घेताना दिसतो. दरम्यान, युझवेंद्र चहल आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चहल रोहित शर्मासोबत मस्ती करतो आणि त्याचवेळी हिटमॅनही त्याच्याच शैलीत चहलला थेट उत्तर देतो.

चहलच्या एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणतो, 'आमची टीम नेहमी 10 व्या क्रमांकावर विचार करते, जो 11व्या क्रमांकावर जो खेळतो त्याचा आम्ही विचार करत नाही. जसं की तू. तुझा विचार आम्ही करत नाही.' 

रोहितचं उत्तर ऐकून चहल मस्करीत 'आमच्या तोंडावर आमचा अपमान होत आहे, असं म्हणताना दिसतोय. सोशल मीडियावर हा व्हिडीयो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया विरूद्धचा टी20 सामना संपल्यानंतरचा हा व्हिडीयो आहे.

टीम इंडियाला आता टी-20 वर्ल्ड 2022आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विजयाची नोंद करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल आणि रविचंद्रन अश्विन.