Rohit Sharma Century: आजचा दिवस भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit sharma) खूप मोठा दिवस आहे. तब्बल 3 वर्षानंतर भारताच्या कर्णधाराने वनडेमध्ये शतक (ODI Century) झळकावलं आहे. 2020 मध्ये रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटचं शतक झळकावलं होतं. हा दुष्काळ त्याने आज संपवून शानदार शतक ठोकलं आहे. दरम्यान आजच्या शतकानंतर रोहित शर्मा भावूक (Rohit sharma gets Emotional) झाल्याचं दिसून आलं.
रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.
आजचं शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने खास पद्धतीने आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होता होत होत्या. अखेर त्याने आज शतक झळकावून दुष्काळ संपवला आहे. 3 वर्षांनंतर सेंच्युरी झळकावल्यावर रोहित शर्मा भावूक झाला होता. यावेळी त्याने आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले.
तर दुसरीकडे माजी कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव डगआऊटमध्ये फार खुशीत दिसत होते. रोहितची सेंच्युरी होताच दोन्ही खेळाडू जागेवरून उठून जोरजोरात टाळ्या वाजवताना दिसले. यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित का शतक सेलिब्रेशन pic.twitter.com/6HKgLpPYCN
— binu (@binu02476472) January 24, 2023
रोहित शर्माने त्याचं शेवटचं वनडे शतक 2020 मध्ये ठोकलं होतं. त्याने त्याचं हे शतक ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलं होतं. या सामन्यामध्ये रोहितने 119 रन्सची उत्तम खेळी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो खराब फॉर्मशी झुंजत असल्याचं दिसलं. अखेर त्याने 3 वर्षानंतर त्याचा शतकांचा दुष्काळ संपवला आहे.