Rohit Sharma च्या चाहत्यांनीही जिंकलं मन; कर्णधाराने सेंच्युरी ठोकल्यानंतर केलं मोठं काम

तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 385 असा बलाढ्य स्कोर उभा केला आणि विजय देखील मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी देखील एक मोठं काम केलं आहे.

Updated: Jan 26, 2023, 06:15 PM IST
Rohit Sharma च्या चाहत्यांनीही जिंकलं मन; कर्णधाराने सेंच्युरी ठोकल्यानंतर केलं मोठं काम title=

Rohit Sharma Fans : कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरूद्ध शतक झळकावत 3 वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला. तब्बल 1000 दिवसांच्या नंतर रोहित शर्माने शतक ठोकत (Rohit Sharma ODI century) चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. न्यूझीलंडविरूद्धच्या (IND vs NZ) तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 385 असा बलाढ्य स्कोर उभा केला आणि विजय देखील मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी देखील एक मोठं काम केलं आहे. 

रोहित शर्माच्या चाहत्यांचा स्तुत्य उपक्रम

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी गरजुंना जेवणाचं वाटप केलं आहे. चेन्नईमध्ये असलेल्या थगाम फाऊंडेशनने रोहित शर्माच्या चाहत्यांसोबत हा उपक्रम राबवला. गरजुंना दिलेल्या या खाण्याच्या पॅकेट्सवर स्टिकर लावण्यात आले होते. या स्टिकरवर, 'रोहित शर्माची कमबॅक सेंच्युरी' असं लिहिण्यात आलं होतं. 

रोहितच्या चाहत्यांनी केलेल्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतायत.

हिटमॅन इज बॅक

तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने त्याच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. अखेर 1100 दिवसांनंतर म्हणजेच तब्बल 3 वर्षानंतर रोहित शर्माने वनडे सामन्यात शतक झळकावलं आहे. रोहितने त्याच्या वनडे करियरमधील 30 वं शतक ठोकलं आहे. यासोबतच रोहितने रिकी पाँटिंगच्या वनडे शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केलीये.

कर्णधाराची तुफान खेळी

रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.

तब्बल 3 वर्षानंतर रोहितचं शतक

रोहित शर्माने त्याचं शेवटचं वनडे शतक 2020 मध्ये ठोकलं होतं. त्याने त्याचं हे शतक ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलं होतं. या सामन्यामध्ये रोहितने 119 रन्सची उत्तम खेळी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो खराब फॉर्मशी झुंजत असल्याचं दिसलं. अखेर त्याने 3 वर्षानंतर त्याचा शतकांचा दुष्काळ संपवला आहे.