रोहित शर्मा-द्रविडचे मिशन World Cup, पहिल्या IND VS SL टी-20 सामन्यात अनोखा प्रयोग

2013 पासून भारतीय संघाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतीय संघाला ही संधी गमवायची नाही. राहुल द्रविड आणि बीसीसीआय यासाठी संघात मोठे बदल करत आहेत.

Updated: Feb 25, 2022, 08:53 PM IST
रोहित शर्मा-द्रविडचे मिशन World Cup, पहिल्या IND VS SL टी-20 सामन्यात अनोखा प्रयोग title=

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) आतापासूनच टी20 वर्ल्डकपची सुरुवात केली आहे. त्यासाठी संघात तसे बदल देखील केले जात आहेत. नवीन खेळाडूंना संघात खेळवलं जात आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. भारतीय संघात अनेक नव्या खेळाडूंनी आपल्या शानदार कामगीरीने आपली संघातील जागा निश्चित केली आहे.
 
या वर्षी होत असलेला T20 विश्वचषक (T20 world Cup 2022) आणि एकदिवसीय विश्वचषक (World cup 2023) डोळ्यासमोर ठेवूनच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला विजयरथ पुढे नेत आहे. घरच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये 6-0 असा पराभव केला. आता श्रीलंकेविरुद्ध घरच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकलाय. 1-0 ने आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL 1st T20) लखनऊ सामन्यात टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 199 धावा केल्या. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 6 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावाच करता आल्या. भारतीय संघाने हा सामना 62 धावांनी जिंकला. रोहितने या सामन्यात गोलंदाजीचेही बरेच प्रयोग केले. त्याने सामन्यात 7 गोलंदाजांना आजमावले.

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना गोलंदाजीतही त्यांचे इतर पर्याय वापरायचे होते. रोहितने तीन स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलला प्लेइंग-11 मध्ये खेळवले. याशिवाय फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा होते. या 5 गोलंदाजांनी मिळून 14 ओव्हर्स टाकले. या शिवाय वेंकटेश अय्यर आणि दीपक हुड्डा याने देखील 3 ओव्हर्स टाकले. अशा प्रकार भारतीय संघातून 7 गोलंदाजांनी बॉलिंग केली.