IND vs ENG: राजकोटमध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीम इंडियाचा डाव एका बाजूने कर्णधार रोहित शर्माने धरून ठेवला होता. टीम कठीण परिस्थितीत असून सुद्धा रोहित शर्माने शतक झळकावलं. टेस्ट क्रिकेटमधील रोहित शर्माचं हे 11 वं शतक होतं. रोहित शर्माच्या इंटरनॅशन कारकिर्दीतील हे 47 वं शतक आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेली. भारताने 33 रन्सवर 3 विकेट्स गमावले होते. मात्र टीमच्या खडतर परिस्थितीत रोहित शर्माने हार मानली नाही. या सामन्यात एका बाजूने डाव सावरत त्याने 157 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावलं.
आंतरराष्ट्रीय शतकांमध्ये रोहित शर्माच्या खात्यात वाढ झाली असून हिटमॅनचं हे 47 वं शतक होतं. यावेळी एक्टिव्ह खेळाडूंमध्ये रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एक्टिव्ह खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या यादीमध्ये रोहितने जो रूटला मागे टाकलं आहे. या खेळाडूंमध्ये सर्वाधिक 80 शतकं आहेत. या खालोखाल डेव्हिड वॉर्नरच्या नावे 49 शतकं आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून जो रूट आता 46 शतकांसह चौथ्या स्थानावर आहे.
आजच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने 218 दिवसांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. या सामन्यात रोहित शर्मानेही सिक्स मारण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलंय. महेंद्रसिंग धोनीने टेस्ट सामन्यात एकूण 78 शतकं झळकावली होती. हिटमॅनच्या नावे टेस्टमध्ये 11 शतकं आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 31 शतकांची नोंद आहे. याशिवाय रोहितने T20I मध्ये पाच शतकं झळकावली आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.