भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पक्षांचे आवाज काढू लागला Rohit Sharma; हिटमॅनचा व्हिडीओ एकदा पाहाच!

रोहित पत्रकार परिषदेत पक्षाचा आवाज काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Mar 3, 2023, 09:56 PM IST
भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पक्षांचे आवाज काढू लागला Rohit Sharma; हिटमॅनचा व्हिडीओ एकदा पाहाच! title=

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कांगारूंनी भारताचा 9 विकेट्सने दारूण पराभव केला. या संपूर्ण सामन्यात ओपनर रोहित शर्माची बॅटही शांत दिसली. मात्र सामन्यानंतर रोहित शर्माने त्याच्या विचित्र कृत्यामुळे सर्वांची मनं जिंकून घेतली. रोहित शर्माचा हा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसतोय. 

प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्माने हे काय केलं?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. दरम्यान कर्णधार झाल्यापासून तो प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसतोय. इतकंच नाही तर तो मैदानात खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसतो. मात्र यावेळी रोहित पत्रकार परिषदेत पक्षाचा आवाज काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हिटमॅनचा व्हिडीओ व्हायरल

पत्रकार परिषदेत रोहित रिपोटर्सच्या प्रश्नांची उत्तर देत होता. यावेळी एका प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी, रोहित विचित्र चेहरे करू लागला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी रोहित पक्षाचा आवाज काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी रोहित मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला.

तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया अपयशी ठरली आहे. रोहित टीमचे सर्व 'प्लानिंग' फोल ठरले चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

WTC Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचं स्थान पक्कं

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने या विजयासह फायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 68.52 पॉईंट्स झाले आहेत.