रोहितचा विक्रम, धोनीशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही.

Updated: Sep 23, 2019, 12:59 PM IST
रोहितचा विक्रम, धोनीशी बरोबरी title=

बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. या सीरिजच्या दुसऱ्या टी-२०मध्येही रोहितने निराशा केली. बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण रोहित तिसऱ्या ओव्हरमध्येच आऊट झाला. या मॅचसाठी मैदानात उतरताच रोहितच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. 

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितने भारतासाठी ९८ टी-२० मॅच खेळल्या आहेत. एमएस धोनीनेही एवढ्याच मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. रोहितने ९८ मॅचमध्ये ३२.१४ च्या सरासरीने आणि १३६.५६च्या स्ट्राईक रेटने २,४४३ रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने ४ शतकं आणि १७ अर्धशतकं केली आहेत. एवढी शतकं करणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे. 

भारताकडून सर्वाधिक टी-२० खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने भारतासाठी ७८ मॅच खेळल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या विराटने ७२ टी-२० मॅच खेळल्या आहेत. ५८ मॅच खेळलेला युवराज पाचव्या क्रमांकावर आणि ५५ मॅच खेळलेला शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे.