सलग चौथ्या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला, म्हणाला....

आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाल्यापासून कर्णधार रोहित शर्माची टीम चौथ्यांदा पराभूत झाली. 

Updated: Apr 10, 2022, 08:49 AM IST
सलग चौथ्या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला, म्हणाला.... title=

मुंबई : आयपीएलमध्ये 18 वा सामना बंगळुरु विरुद्ध मुंबई झाला. फाफ ड्यु प्लेसीसच्या टीमने मुंबईवर 7 विकेट्सनं विजय मिळवला. मुंबई टीमचा सलग चौथा पराभव आहे. सलग होत असलेल्या पराभवामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापला. त्याने मॅचनंतर मोठा विधान केलं. 

आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाल्यापासून कर्णधार रोहित शर्माची टीम चौथ्यांदा पराभूत झाली. रोहितला त्याच्या टीममध्ये फलंदाजी अजून सुधारण्याची गरज आहे. मुंबईने पहिली फलंदाजी करत 6 गडी गमावून 151 धावा केल्या. बंगळुरुसाठी हे लक्ष्य फारच छोटं होतं. 

बंगळुरु टीमने 3 गडी गमावून आपलं लक्ष्य गाठलं. मुंबई टीमने 62 धावांपर्यंत 5 विकेट्स गमावल्या होत्या. पावरप्ले आणि फलंदाजीसाठी रोहित शर्माला टीमवर खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. 

जास्त वेळ फलंदाजी करण्याची माझी इच्छा होता. मात्र चुकीच्या वेळी मी आऊट झालो. आम्ही 50 धावांची भागीदारी केली. त्यामुळे मी थोडा नाराजही आहे. या सामन्यात टीम खूप जास्त कमकुवत होती. या सामन्यात फलंदाजच खरे खलनायक बनले. गोलंदाजांनी आपली कामगिरी बरी केली असं म्हणायला हवं. 

सूर्यकुमार यादवने 37 बॉलमध्ये 68 धावा केल्या. मुंबईचा डाव 150 धावांमध्ये आटोपला. बाकी फलंदाजांनी विशेष योगदान दिलं नाही. रोहित म्हणाला की सूर्यकुमार यादवने आम्हा सगळ्यांना हे दाखवून दिलं आहे. 150 हा आकडा या पीचवर पुरेसा नाही. मी सगळं श्रेय सूर्यकुमार यादवा देऊ इच्छितो असंही रोहित शर्मा म्हणाला. 

बंगळुरु टीमने खूप विचारपूर्वक फलंदाजी केली. आम्हाला फलंदाजीमध्ये खूप सुधारणा करण्याची गरज आहे. अनुज रावतने 66 धावा केल्या. त्याच्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालं त्याचंही कौतुक रोहितने केलं.