T20 World Cup : बुमराह वर्ल्डकपबाहेर पडल्यानंतर Rohit Sharma आणि विराट गोलंदाजीसाठी सज्ज, चाहतेही अवाक्!

वर्ल्डकपसाठी आता टीम इंडियाकडे प्रमुख गोलंदाज कोण असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे.

Updated: Sep 30, 2022, 12:23 PM IST
T20 World Cup : बुमराह वर्ल्डकपबाहेर पडल्यानंतर Rohit Sharma आणि विराट गोलंदाजीसाठी सज्ज, चाहतेही अवाक्! title=

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20  मालिकेसह टी20 विश्वचषक स्पर्धेमधून (T20 World Cup 2022) बाहेर पडल्याचे जाहीर केले. यामुळे टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपसाठी आता टीम इंडियाकडे प्रमुख गोलंदाज कोण असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे. अशातच आता कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

या फोटोमध्ये रोहित आणि विराट दोघंही गोलंदाजी करताना दिसतायत. या दोघांच्याही फोटोवर 'बुमराहनंतर कोण' असंही लिहिण्यात आलंय. यामुळे फोटोमुळे नेटकऱ्यांनी आता विराट आणि रोहितही गोलंदाजी करणार असा अंदाज लावला आहे. या दोघांचीही गोलंदाजी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

बीसीसीआय अधिकारी काय म्हणाले?

बुमराहच्या दुखापतीवर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलीये. "बुमराह निश्चितपणे टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, हे नक्की आहे. बुमराहला पाठदुखीचा त्रास आहे. त्यातून सावरण्यासाठी 4 ते 6 महिन्याचा वेळ लागू शकतो", अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सागंण्याची अटीवर दिली.

बुमराहला 'या' दुखापतीमुळेच दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात खेळता आलं नव्हतं. बुमराहला सकाळी पाठीचा त्रास जाणवतोय, असं कॅप्टन रोहित शर्माने टॉसवेळेस सांगितलं होतं. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात बुमराह वर्ल्ड कपला मुकणार की काय, अशी चर्चा रंगू लागली होती. अखेर ही भीती खरी ठरलीये.

बुमराहच्या जागी कोणाला संधी?

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी बीसीसीआयने (BCCI) मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संधी दिलीये. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडकर्त्यांनी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात समावेश केला आहे.