VIDEO: कॅमेरा दिसताच पळत सुटला Rohit Sharma, सोशल मीडियावर व्हिडीयो व्हायरल

अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Updated: Sep 15, 2022, 11:37 AM IST
VIDEO: कॅमेरा दिसताच पळत सुटला Rohit Sharma, सोशल मीडियावर व्हिडीयो व्हायरल title=

दुबई : आशिया कप 2022 टीम इंडियासाठी काही फारसा चांगला नव्हता. आशिया कपमध्ये भारताची सुरुवात भलेही विजयाने झाली असेल, पण सुपर फोर टप्प्यातील सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचं आशिया कपमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिले. आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला होता की, ड्रेसिंग रूमचे वातावरण चांगले आहे. 

आशिया कपदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंनीही खूप धमाल केली. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच टीम इंडियाच्या खेळाडूंचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये ते स्पायडरकॅमसोबत मस्ती करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक स्पायडरकॅमसमोर मस्ती करताना दिसतायत. त्याच्यासोबत प्रशिक्षक पॅडी अप्टन यांचाही सहभाग दिसून आला. व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलही दिसतायत. चहल स्पायडर कॅमसोबत बोलतोय आणि कॅमेराला त्याच्याकडे बोलवतोय. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू हसताना आणि जोक्स करताना दिसले.

अफगाणिस्तानवर 101 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने आशिया कपमधील आपला प्रवास संपवला. तब्बल तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांना विराट कोहलीचं शतक पाहायला मिळालं.

टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये खेळायचं आहे, पण त्याआधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर सिरीज खेळायचीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 20 सप्टेंबरपासून सुरू होतोय, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.