Rohit Sharma: चुकीचं आऊट दिल्यामुळे रोहितकडून अंपायरला शिवीगाळ? VIDEO झाला व्हायरल

Rohit Sharma: इंग्लंडच्या टीमचा ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फलंदाजी करत होता. यावेळी 7 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या बॉलवर अंपायरने रोहितला चुकीचा आऊट दिला. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 7, 2024, 08:28 PM IST
Rohit Sharma: चुकीचं आऊट दिल्यामुळे रोहितकडून अंपायरला शिवीगाळ? VIDEO झाला व्हायरल title=

Rohit Sharma: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील शेवटचा म्हणजेच पाचवा सामना धर्मशालामध्ये खेळवला जातोय. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंजांना गुंडाळलं. यानंतर टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली आणि कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) खणखणीत अर्धशतक ठोकलंय. मात्र यावेळी मैदानावर एक अशी घटना घडली, ज्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतोय.

या सिरीजमध्ये टीम इंडिया 3-1 अशी आघाडीवर असलेल्या पाचव्या सामन्यात देखील मजबूत पकड कायम ठेवली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला काही प्रमाणात महागात पडलेला दिसला. टीमला पहिल्या डावात चांगला स्कोर उभारता आला नाही. पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सेशन दरम्यान रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओनंतर रोहित अंपायरला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात येतोय.

रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

इंग्लंडच्या टीमचा ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फलंदाजी करत होता. यावेळी 7 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या बॉलवर अंपायरने रोहितला चुकीचा आऊट दिला. त्यानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma ) कोणताही विचार न करता डीआरएस घेतला. यादरम्यान रोहित हसताना आणि अंपायरला काही अपशब्द बोलताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. ( व्हायरल झालेल्या व्हिडीओची झी 24 तास खातरजमा करत नाही )

दरम्यान रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेमध्ये अँडरसनने कॉट बिहाइंड आऊटची मागमी केली होती. तर मैदानावरील अंपायरने हिटमॅनला बाद करार दिला. डीआरएसच्या निर्णयानंतर मैदानावरील अंपायरने निर्णय बदलून भारतीय कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) नाबाद घोषित केलं.

रोहित शर्माने रचला नवा विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने सिक्स लगावला. या सिक्ससोबतच त्याने असा पराक्रम केला जो आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC च्या इतिहासात 50 सिक्स लगावणारा तो जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आत्तापर्यंत 32 सामन्यांच्या 54 डाव खेळले असून धर्मशालाच्या सामन्यात त्याने पहिला सिक्स मारताच त्याच्या सिक्सची संख्या 50 वर पोहोचली आहे.