Roger Federer Retirement: महान टेनिसपटू रॉजर फेडरर इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या

विराट कोहली, धोनीपेक्षा कैकपटीने जास्त कमावतो, इतक्या कोटीच्या संपत्तीली मालक आहे रॉजर फेडरर

Updated: Sep 15, 2022, 10:02 PM IST
Roger Federer Retirement: महान टेनिसपटू रॉजर फेडरर इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या  title=

मुंबई : महान टेनिसपटू रॉजर फेडररने (Roger Federer Retirement) गुरुवारी अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर त्याने या संदर्भातील माहीती दिली. या घोषणेने टेनिस विश्वाला मोठा धक्का बसला. 41 वर्षीय रॉजर फेडरर (Roger Federer) हा टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडू असण्यासोबतच तो संपत्तीतही आघाडीवर आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये फेडररची गणना होते. दरम्यान या स्टार खेळाडूची नेमकी एकूण संपत्ती किती आहे ती जाणून घेऊयात. 

निवृत्तीची पोस्ट
रॉजर फेडररने (Roger Federer Retirement) सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहत निवृत्तीची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, 'मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. आता ते सोडण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्याने निवृत्तीची घोषणा केली. तसेच तो पुढे म्हणाला, पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर कपमध्ये शेवटच्या वेळी व्यावसायिक स्तरावर खेळताना दिसणार आहे. दरम्यान फेडररच्या या घोषणेनंतर फॅन्सना या मॅचची उत्सुकता लागलीय. 

संपत्ती किती?
एका मीडिया रिपोर्टनुसार, 4 सप्टेंबर 2022 पर्यंत, या टेनिस स्टारची एकूण संपत्ती 550 मिलियन डॉलर आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत  44,000 कोटी रुपये होतो. टेनिस व्यतिरिक्त, तो अनेक प्रसिद्ध ब्रँडचाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. यामधून देखील त्याची मोठी कमाई व्हायची. 

विराट-धोनीलाही टाकतो मागे
स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि एमएस धोनी कमाईच्या बाबतीत रॉजर फेडररपेक्षा (Roger Federer Retirement) खूप मागे आहेत. विराट कोहलीची एकूण संपत्ती सुमारे 170 मिलियन डॉलर आहे आणि धोनीची एकूण संपत्ती 113 मिलियन डॉलर आहे. साधारण फेडररची कमाई कोहलीच्या तुलनेत तिप्पट आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीतही तो आघाडीवर आहे.  

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
फेडरर अनेक मोठया ब्रॅडसचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील आहे. यामध्ये प्रसिद्ध घड्याळांची कंपनी रोलेक्सचं नाव समोर येते. फेडरर 2006 पासून रोलेक्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, त्याने 2006 मध्ये जगातील प्रसिद्ध लक्झरी वॉच कंपनीसोबत 10 वर्षांचा करार केला होता. हा करार 15 मिलियन डॉलर किमतीचा होता. म्हणजेच त्याने रोलेक्स ब्रँडमध्ये सामील होऊन दरवर्षी सुमारे 1.5 मिलियन डॉलर कमावले. जेव्हा हा करार 2016 मध्ये संपला तेव्हा कंपनीने पुन्हा वर्षाला त्याला 8 मिलियन डॉलर देऊन साईन केले होते. 

टेनिसमधून इतकी संपत्ती कमवली?
फेडररच्या (Roger Federer Retirement) एकूण संपत्तीचा मोठा हिस्सा टेनिसच्या कमाईतून येतो. त्याने विविध स्पर्धांमधून सुमारे 129 मिलियन डॉलर कमावले आहेत. फक्त रोलेक्सच नाही, फेडररचे क्रेडिट सुईस, मर्सिडीज बेंझ आणि युनिक्लो यांसारख्या कंपन्यांशीही करार केला होता. यामधून तो मोठी कमाई करायचा. 


 
आलिशान कार्सचा मालक 
रॉजर फेडररला (Roger Federer)  आलिशान कार्सही आवडतात. त्याच्याकडे अनेक मर्सिडीज कार आहेत. यामध्ये Mercedes AMG GT S, Mercedes GLE G663 Coupe, Mercedes SL AMG, Mercedes SL AMG Roadster आणि Mercedes CLS 450 याशिवाय अनेक मर्सिडीज बेंझ क्लासिक वाहनांचा समावेश आहे. मर्सिडीज व्यतिरिक्त, महान टेनिसपटूकडे रेंज रोव्हर SVR देखील आहे.

दरम्यान टेनिसमध्ये टॉपचा खेळाडू होण्यासोबतच फेडरर (Roger Federer)  संपत्तीतही खुप आघाडीवर आहे. त्याच्या या निवृत्तीने फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.